मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. परदेशातील संधी
Written By वेबदुनिया|

कला अध्ययनासाठी जर्मनीत जायचंय?

WD
जर तुम्ही कला क्षेत्राशी निगडीत असाल आणि उच्च शिक्षण घेण्याची ईच्छा असेल तर जर्मनीत जाऊन तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. डीएएडीद्वारा कलाकारांना दिली जाणारी स्कॉलरशिप आहे जी एक्सटेंशन स्टडीजच्या रूपात दिली जाते. यासाठी फाईन आर्ट, डिझाईन, फिल्म, म्युझिक, परफॉर्मिंग आर्ट इत्यादी विषयात बॅचलर किंवा मास्टर डिग्री करणारे यासाठी अर्ज करू शकता. अ‍ॅकेडमिक ईयर अंतर्गत संपूर्ण कोर्सच्या दरम्यान आर्थिक मदत दिली जाते. आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला 750 यूरो स्टायपेंडसह, भारत ते जर्मनी विमान खर्च दिला जातो. ज्या विद्यार्थ्याची निवड स्कॉलरशिपसाठी केली जाते त्यांच्याकडून नंतर कोणत्याही प्रकारची फिस घेतली जात नही. स्टडी आणि रिसर्चमध्ये सबसिडी दिली जाते. डीएएडीनिवड झालेल्यांची हेल्थ इन्शोरन्ससुद्धा केला जातो. सहा महिन्यांसाठी इंटरनेट बेस्ड्‍ लॅग्वेज कोर्ससुद्धा केला जातो. जो यासाठी प्रवेश घेतो त्याच्यासोबत पती अथवा पत्नी असल्यास त्याचा कोणत्याही प्रकारचा खर्च उचलला जात नाही.

योग्यत
प्रथम श्रेणीमध्ये शेवटची डिग्री मिळवलेली असावी आणि शेवटची डिग्री घेण्यात 6 वर्षापेक्षा जास्त अंतर नसावे. अर्ज करतेवेळी अर्जदार भारतातील रहिवासी असावा.

विषय
फाईन आर्ट डिझाईन, फिल्म-म्युझिक परफॉर्मिंग आर्ट (ड्रामा, डायरेक्शन, डांस, कोरिओग्राफी ‍इत्यादी). लक्षात ठेवा अर्ज करताना सर्व डाक्युमेंटच्या दोन कॉपी संबं‍धीत पत्त्यावर पाठवाव्यात. ऑनलाईन अर्जाबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो अवश्य लावावा. दोन्ही ठिकाणी अर्जदाराच्या स्वाक्षर्‍या असाव्यात. संपूर्ण बायोडाटा टाईप केलेला असावा. जर्मनीत प्लान्ड स्टडी प्रोजेकट करण्याचे अ‍ॅके‍डमिक आणि पर्सनल रिझन देणे आवश्यक आहे. ही माहिती पाठविताना वरिष्ठ अधिकार्‍यांचा रेफरन्स पाठविणे आवश्यक आहे. याबरोबर लॅग्वेज स्कोअर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी डीएएडी-2, न्यायमार्ग चाणक्यपुरी, नवीदिल्ली- 110021 किंवा www.daaddelhi.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकता.