गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By वेबदुनिया|

मैत्रीच्या आड येणारे ग्रह

सगळयांचे सगळ्यांशी जमते असे नाही. मैत्रीचेही तसेच आहे. ती सगळ्यांशीच होते असे नाही. काही जणच आपले चांगले मित्र असतात. अगदी वर्गापासून ऑफिसापर्यंत हेच आपल्याला दिसून येईल. याचे कारण परस्परांचे 'ग्रह' आहेत. हे ग्रह आकाशातले तर आहेच. शिवाय पूर्वग्रहही आहे.

आता ज्योतिषानुसार पहायचं झालं तर कुंडलीतील तिसरा भाव मैत्रीचा असतो. बारा वेगवेगळ्या राशी म्हणजे वेगवेगळे तत्व आहे. हे तत्व कोणते त्यानुसार या राशीच्या माणसांची परस्परांशी मैत्री ठरवता येते.

मेष, सिंह व धनु राशि अग्नि तत्व

वृषभ, कन्या, मकर पृथ्वी तत्व

मिथुन, तुला, कुंभ वायु तत्व

कर्क, वृश्चिक, मीन जल तत्व

ज्योतिषशास्त्रानुसार अग्नी व वायू तत्वाच्या राशींची मैत्री होऊ शकतो. पृथ्वी व जल तत्वाची मैत्री होऊ शकते. याचा अर्थ जल व वायू आणि अग्नी व पृथ्वी या तत्वाच्या राशिच्या मंडळींशी परस्परांशी मैत्री होत नाही, असे नाही. पण ही मैत्री दीर्घकाळ चालण्यात अडचणी निर्माण होतात.

आता पूर्वग्रहाचे पाहूया.

एखाद्याच्या विषयी आपल्या मनात पूर्वग्रह असेल तर मैत्री करण्यात अडथळा येतो. एखाद्याच्या स्वभावाविषयी आधीच अंदाज लावण्याचा आपला स्वभाव असतो. त्यातून अनेकदा चुकीचे अंदाज बांधले जातात. त्यातून दोस्ती होत नाही. काही वेळा कुणाच्या सांगण्यावरून आपण एखाद्याविषयी मैत्री करत नाही. काही वेळा कुणी तरी एखाद्याविषयी काही सांगतो. ते आपण मनात धरून बसतो. त्यामुळे मैत्रीत अडथळा येतो. वास्तविक संबंधित व्यक्ती आपल्याशी अतिशय चांगली वाटत असते. पण तरीही आपल्याकडून मैत्रीचा हात पुढे केला जात नाही.

काही जणांची तर मैत्री न होण्याची कारणे अनेक असतात. काहींना एखाद्याचा चेहरा आवडत नाही. काहींना आवाज आवडत नाही. काहींना त्याचे हावभाव किंवा एखादी वैयक्तिक गोष्ट आवडत नाही. काहींना सवयी आवडत नाही. पण आपण असा विचार करत नाही, समोरच्यालाही आपल्या काही गोष्टी नक्कीच आवडत नसतील. तरीही तो मैत्रीसाठी हात पुढे करतोय हे लक्षात घ्यायला हवे. शेवटी कुणीही सर्वगुणसंपन्न नसतो.

मैत्रीसाठी मनातले पूर्वग्रह संपवायला हवेत. म्हणजे मैत्री घट्ट होऊ शकेल.