गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By वेबदुनिया|

ही दोस्ती तुटायची नाय!

मैत्री म्हणजे आस...मैत्री म्हणजे प्रेम,
मैत्री म्हणजे त्याग... मैत्री म्हणजे विश्वास..!

मैत्रीची वेल जीवनाच्या बागेत अलगद फुलत असते. ती कधी केव्हा बहरते याची आपल्याला कळतच नाही. तिला आपण कितीही उपमा दिल्या तरी अपुर्‍या पडतील, अशी मैत्री आहे. जीवनाच्या प्रवासात आपण लहानाचे मोठे होतो. या प्रवासात अनेक व्‍यक्ती आपल्याशी जुळतात. परंतु आपण प्रत्येकाशीच मैत्रीचं नाते जोडत नसतो तर त्यातील एखादाचा आपला मित्र असतो. ही दोस्ती आपल्या आयुष्याची शिदोरी असते.

मैत्रीचं नातं हे विश्वासावर टिकत असतं. तसेच मैत्रीत भावनांना खूप महत्त्व असते. आपल्या मित्राच्या भावना दुखणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागत असते. परंतु कधी कधी या भावनांच्या गोंधळात मैत्रीला तडा जाते आणि सुरवातीला 'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणणारे सहज दोस्ती तोडून मोकळे होतात.

'मैत्री' म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. या दोनही बाजू नेहमी एकमेकांना समांतर असायला पाहिजे. जर का? त्या डगमगल्या तर मात्र त्याचा परिणाम मैत्रीमधील नात्यावर होत असतो.

पुढे पहा ही दोस्ती न तुटण्यासाठी काही टिप्स-


* चुका, या व्यक्तीकडून होणारच. आपल्या चुकणार्‍या मि
WD
त्राला माफ करा. जर तीच ती चुक तो करत असेल तर त्या चुकीचे कारण शोधून काढण्यास त्याला मदत करा.


* मैत्रीला कधीही पैशाचा स्पर्श होऊ देऊ नका. पैसा हा वाईट असतो. तो संबंध खराब करतो. मैत्रीत पैशाचा व्यवहार चोख ठेवा अन्यथा पैशाचे व्यवहात शक्यतो टाळा.

* मैत्री व प्रेमात तिसरा व्यक्ती हा घातक असतो. त्यामुळे मैत्रीत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे.

* मैत्री ही काही‍ एक-दोन दिवसाची नाही तर ती आयुष्याची शिदोरी असते. शब्दांच्या मर्यांदा पाळा. शब्दामागे शब्द निघतात. त्याने वाद होतात. त्यासाठी मैत्री तुटणार नाही, यांची काळजी घ्या.