testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Friendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...

वेबदुनिया|
* मैत्रिणींशी जवळीक करण्याचा प्रयत्न टाळा.
* मैत्रीचं नातं हे पवित्र असतं, असं केवळ म्हणू नका, आचरणात आणायचाही प्रयत्न करा.
*मित्रावर एखादे संकट कोसळले आहे, याची माहिती त्याने तुम्हाला आधी का कळवली नाही हा टेप वाजवण्यापेक्षा त्याला त्वरित कोणत्या प्रकारची मदत देणे शक्य आहे ते पाहा, आणि कामाला लागा.
*मुलींचा मित्र म्हटलं की घरातील मंडळींच्या कपाळावर आट्या पडणे साहजिकच आहे, परंतु अशा प्रसंगी आपल्या मैत्रिणींच्या कुटुंबीयांची ओळख करून घेत त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा. *शक्यतो कट्ट्यावर आपल्याच ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींचे अफेर वगैरे आहे, या गप्पा करणे टाळा.
* काही प्रसंगी मुली कितीही बोल्ड असल्या तरी त्यांना नमते घेत तुम्ही दिलेल्या ऑफर्सला नकार देणे भाग पडते, अशा प्रसंगी त्यांना समजून घ्यायला शिका. त्यांच्याविषयी गैरसमज टाळा.
*मुलींनीही आपल्या मित्रासोबत मैत्री करताना काही प्रसंगी अंतर ठेवणेच चांगले असते. * मैत्रीची ऑफर जर कोणी देत असेल, तर त्याचा त्या मागील दृष्टिकोन काय? त्याचा स्वभाव कसा आहे? याची खात्री झाल्याखेरीच मैत्रीसाठी हात पुढे करू नका.
* इंटरनेटचे जग सध्या वेगाने वाढत आहे, अशा प्रसंगी जर तुम्हाला कोणी नेटच्या माध्यमातून किंवा इ-मेलच्या माध्यमातून मैत्रीची ऑफर दिली, तर पटकन निर्णय घेऊ नका. इंटरनेटवर देण्यात येणारी माहिती खरी असतेच असे नाही. *मिस कॉल येत असेल तर अशा प्रसंगी घरातील मंडळींना ही माहिती द्या. फोनवरून कोणतीही मैत्रीची ऑफर स्वीकारू नका.
* आपल्याला घरी जाण्यास उशीर जरी झाला तरी घरातील सर्वांना आपल्या प्रत्येक मित्राविषयी अथवा मैत्रिणींविषयी माहिती द्या.
*मैत्रीत कधीकधी आकर्षणही असतंच.. अशा प्रसंगी स्वतः:च्या मनाला सावरायला शिका.
*एखादा मित्र अथवा मैत्रीण आवडायला लागली तर त्यांचा तेवढा आदर करून त्यांना हे स्पष्टपणे सांगा. त्याने अथवा तिने घेतलेल्या निर्णयाचा आदरही करा. *मी तुला केवळ मित्र मानतो, बाकी काही नाही, असा पाढा नेहमीच वाचने मैत्रीसाठी घातक ठरू शकते.
* एखाद्या विषयी मित्र अथवा मैत्रीण करण्याची ओढ असली तरी त्याच्या मर्जी शिवाय मैत्रीचा अट्टहास धरू नका.

असे अनेक नियम आपण मैत्री करताना पाळावेत. यातूनच आपल्याला एक सच्चा मिळू शकतो. मैत्री हे असे एक रसायन आहे की ज्यात आपण कोणताही रंग मिसळला तरी त्याचा रंग बदलतो. उदाहरण द्यायचेच झाले तर आपण मैत्रिणीला किंवा मित्राला आपली गुपितं सांगितली की आपली मैत्री अधिक घट्ट होतेच शिवाय त्याचा रंगही पक्का होतो. पाहा तर हे करून आणि मग पाहा कसा होतो आपला प्रवास......


यावर अधिक वाचा :

यूएईत ४८ तासांपर्यंत थांबण्यासाठी व्हिजाची गरज नाही

national news
यूएई सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जगातील कुठल्याही कोपऱ्यात प्रवास करताना या ...

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला

national news
पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ तांबोळी असे या ...

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने ...

national news
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. ...

धक्कादायक! दुधी भोपळ्याचा रस प्याल्याने शरीरात विष पसरलं, ...

national news
आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा ...

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

national news
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही ...