मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

काही क्षणातच होते मैत्री

WD
मैत्री करताना श्रीमंत व गरीब असे पाहिले जात नाही. मैत्री म्हणजे मित्राला सुख बरोबरच दु:खात देखील मदत केली पाहिजे. मगहवा व लहानशा रोपट्यामध्येही मैत्री असते. हवा रोपट्याला घाबरवतेही व त्याला सावरण्यासाठी त्याला मैत्रीचा हातही देते. त्याला वादळाशी दोन हात करायला शिकवते. अशी मैत्री ही अंखड काळ टिकणारी असते. खरा मित्र तोच असतो की, तो आपल्या मित्रांमधील कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्‍न करतो. अशी मैत्री करायला काही 'फ्रेंडशिप डे'च पाहिजे, असे नाही तर केव्हाही मैत्री होऊ शकते.

मित्राच्या ह्‍दयातून निघणार्‍या भावनाचा सागर म्हणजे मैत्री आहे. मैत्री ही सुप्त ह्दयाची स्पंदने आहेत. मैत्री म्हणजे कैदेतून सुटका झालेल्या पक्षांचा आकाशात मुक्त विहार...तर मैत्री म्हणजे विझलेल्या दिव्याचा प्रकाश... मैत्रीला अशा एकापेक्षा अधिक उपमा कविंनी दिल्या आहेत. श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्री जगाला प्रेरणादायी ठरली आहे. मात्र, श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीसारखी मैत्री आताच्या प्रगत युगात होताना दिसत नाहीत.

WD

मैत्रीमध्ये श्रीमंत व गरीब अशी कधी न भरून निघणारी दरी निर्माण झाली आहे. गरीब घरची मुले व बड्या आसामींची मुले यांच्यात मैत्री होतांना दिसत नाही. त्यांच्या मैत्री झाली तरी ती शंभरातून एक असते व तीही काही दिवसातच विरून जाते. त्यांच्यात मैत्री झाली तरी त्यांच्यात योग्य पध्दतीने समन्वय साधला जात नाही. बड्या आसामींच्या मुले ही पैशात खेळत असल्याने त्यांना त्या पैशाची किंमत नसते व गरीब घरच्या मुलाला मात्र पैसा हा मृगजळासारखा असतो. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली तरी ती जास्त काळ टिकणारी नसते. मैत्री करताना श्रीमंत व गरीब असे पाहिले जात नाही. मैत्री म्हणजे मित्राला सुख बरोबरच दु:खात देखील मदत केली पाहिजे. मग आपण या 'फ्रेंडशिप डे' पासूनच श्रीकृष्‍ण व सुदामा यांच्या मैत्रीला डोळ्यासमोर आणून मैत्री मध्ये दरी निर्माण करणारी श्रीमंत व गरीब नावाची दोन टोके नष्ट करून टाकू व निस्वार्थ, निस्सीम मैत्री साकारूया......