शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Updated : मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (12:45 IST)

फ्रेंडशीपच्या बाबतीत मुलं का ठरतात बेस्ट ?

मैत्री टिकवण्यात बेस्ट कोण, मुली की मुलं? अनेक बाबतीत मुली मुलांपेक्षा पुढेअसल्या तरी दोस्ती के मामले में मुलंच बेस्ट आहेत. मुली-मुली बेस्ट फ्रेंड्‍स असतात. त्यांची मैत्री जगावेगळी असते। मैत्रिणी एकमेकींसोबत अनोखं बाँडिंगही शेअर करतात. हे सगळं खरं असलं तरी आयुष्यभराच्या मैत्रीसाठी दोस्तलोकच पाहिजेत. मित्रांच्या गरजेला धावून येणारे, मित्रांच्या आनंदासाठी आपला आनंद बाजूला ठेवणारी पोरंच असतात बरं का! फ्रेंडशीपच्या बाबतीत मुलं का ठरतात बेस्ट ? जाणून घेऊ या.... 
 
एकदा मैत्री झाली की झाली. ती आयुष्यभर टिकवायची. मुलांचा हाच बाणा असतो. गरजेच्या वेळी तुमचा दोस्त हजर असलाच पाहिजे. मुलं मैत्रीचं मोल मुलींपेक्षा थोडं जास्त जाणतात. संकटातून सोडवण्यासाक्ष अर्थातच दोस्तावर सहज विश्वास टकता येतो. मुलीही मैत्रीला जागतात. पण दोस्तासाठी एक पाऊल पुढे टाकताना पोरं मागे-पुढे पहात नाहीत.
* मित्र एकमेकांशी भावाप्रमाणेच वागतात. तरुणांच्या भाषेत याला ब्रो कोड असं म्हणतात. ब्रो कोडचे काही नियम आणि कायदे असतात. दोस्तमंडळी, हे नियम आयुष्यभर पाळतात. 
 
* मुलं आपल्या भावना इतरांकडे व्यक्त करत नाहीत. मित्रांचा ग्रुप एकमेकांना स्पेस देतो. प्रत्येक गोष्ट शेअर करायलाच पाहिजे, असं काही त्यांच्यात गरजेचं नसतं. धमाल करायची असेल तर मुलांसोबत भटकायला हवं. 
 
* दोस्तमंडळी कायम कूल असतात. आपल्या मित्रांकडून त्यांच्या फारशा अपेक्षा नसतात. असल्या तरी त्या वास्तववादी असतात.
* मुलांच्या गँगमध्ये कोणीही घुसू शकतं. मुलं एकमेकांशी झटकन जुळवून घेतात. छोट्या छोट्या गोष्टींचा ते फार विचार करत नाहीत. 
 
* मुलांच्या मैत्रीत प्रेमाचा अतिरेक नसतो. उगाचच एकमेकांना मिठ्या मारणं, जास्त इमोशनल होणं असले प्रकार त्याच्या गँगमध्ये नसतात. 
 
* मुलं अगदी बिनधास्त धमाल करू शकतात. रात्रीची भटकंती, कोणाचीही कोडी काढणं त्यांना सहजशक्य होतं. म्हणूनच मुलांकडे मैत्रीच्या धमाल आठवणी असतात. तुम्हाला जाणवतोय का, मुलांच्या आणि मुलींच्या मैत्रीतला फरक? आठवून बघा.