testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

त्रिदेवांचा अवतार गणेश

Last Modified सोमवार, 12 सप्टेंबर 2016 (15:07 IST)
सरल-सरल-शुण्डो जिल्भगे वक्रतुण्ड:
समद-विकट-गण्डो गर्वशृंङ्ग भिनत्सि।
दमसि मदन्ति मेकदन्ती च मां
अमृत-किरण-वृन्दं स्न्दसे भालचंद्र:।।
हे गणेशा! सरळ लोकांच ठिकाणी तू सरलशुण्ड असतोस! अपमार्गी लोकांच बाबतीत तू वक्रतुण्ड म्हणजे क्रोधयुक्त होतोस. तुझी मदाने वाहणारी उग्र गण्ड स्थळे उद्धटांचे गर्वहरण करतात. तू स्वत: एक राहून उन्माद करणार्‍या मायेचे दमन करतोस म्हणून तुला एकदन्ती म्हणतात. तुझ्या भालप्रदेशी अमृतकिरणांचा समूह असलेला चंद्र अमृत वृष्टी करतो व तुझ्या भक्तास अमृतत्त्वाप्रत नेतो, म्हणून तुला भालचंद्र म्हणतात.

एखाद्या सोटासारखी तची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली, गुंडाळलेली असते. कपाळावर दोन आवाळे छान दिसतात. खालचा ओठ लोंबलेला असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणाक्षणाला थोडा थोडा गळतो. चौदा विद्यांचा हा स्वामी, त्याचे डोळे अतिशय लहान असून तो त्यांची सारखी उघड-झाक करतो. चांगले लांबरूंद पण लवचिक असलेले आपले कान तो पंखसारखे हालवतो व त्यांचा फडफड असा आवाज होतो. त्याच्या मुकुटांत सुंदर रंगांची रत्ने आहेत. ती तेजाने झळकतात. त्यांचे सुंदर रंग आजूबाजूला प्रकाशतात. गणपतीच्या कानातील कुंडले चमकतातच पण त्यात बसविलेले नीलमणी विशेष प्रकाश टाकतात. त्याचे दात घट्ट व पांढरे शुभ्र आहेत. त्याला
रत्नखचित सोन्याचे कडे आहे. कडय़ाच्या खाली लहान-लहान सोन्याची पाने चमकताना दिसतात. त्याचे विशाल पोट थलथलते. जिवंत नाग कमरेला पट्टय़ासारखा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीची लहान-लहान घुंघरे अगदी मंद आवाजाने झणत्कार करतात. त्याला चार हात आहेत. एका हातांत परशु, दुसर्‍या हातात कमळ, तिसर्‍या हातात टोकदार तेजस्वी अंकुश आणि चौथ्या हातात गोल घेतलेला आहे. असा गणपती भालावर शीतल चंद्र धारण करतो. त्यामुळे चंद्राची शीतलता अधिक वाढते. चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून देवाने चंद्राला म्हणजे मनाला शांत ठेवण्यासाठी आपल्या शीर्षावर धारण केले आहे. अति चंचल मनाला डोक्यानेच शांत केले पाहिजे. नाहीतर ते उन्माद घडवून आणते. प्रसन्न मनाचा मनुष्य शस्त्राने नाही, युक्तीने लढतो. यात दोघांचीही हानी होत नाही, मात्र सबक मिळतो. देव गजानन मस्तकी धारण केलेल्या चंद्राकडून मनापासून मोह-लोभ-माया यांना दूर फेकून देतो व भक्तांना सदैव अभय देतो. मदाने उन्मत्त झालेल्या असुरांना सुद्धा त्याने मायेपासून मुक्त केले आहे. म्हणूनच तो सरळ लोकांना सरल आणि दुष्टांना वक्रतुंड भासतो. दुर्लभ अशा मानव जन्माचे सार्थक श्रीभक्तीतच आहे. तो शिव-विष्णु-ब्रह्म यांचाच अवतार आहे. सत्त्व-रज-तमाचा आविष्कार आहे आणि त्रिजगांचा त्राता आहे. त्रिदेवांना सुद्धा मायेपासून मुक्त करणारा देव गजानन आहे. - विठ्ठल जोशी
विठ्ठल जोशी


यावर अधिक वाचा :

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...

रुद्राक्ष आणि आरोग्य

national news
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने ...

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राशिभविष्य