गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणेश उपासना

बारा महिन्यातील गणपतीची उपासना

चैत्र महिन्यात 'वासुदेव' रूपी गणपतीची उपासना करून सुवर्ण दक्षिणा दिली पाहिजे. वैशाखात 'कर्षण' रूपी गणपतीची उपासना करून शंख दान केले पाहिजे. ज्येष्ठ महिन्यात गणपतीला फळे दान केली पाहिजेत. या महिन्यात गणपतीची आरती 'सतीव्रत' या नावावर केली जाते. आषाढात 'अनिरूद्ध' रूपी गणपतीची आरती करून संन्यासी व्यक्तीला तूंबी-पात्र दान केले पाहिजे. श्रावणात 'बहुला गणपती' पूजा केली पाहिजे. भाद्रपद महिन्यात 'सिद्धी विनायका' ची पूजा करणे आवश्यक आहे. आश्विन महिन्यात 'कपर्दीश' गणपतीची पूजा पुरूषांनी केली पाहिजे. कार्तिक महिन्यात चार सवंत्सरापर्यंत पालनीय व्रताचा विधी आहे. पौष महिन्यात 'विघ्ननायक' गणपतीची आणि माघ महिन्यात 'संकटव्रत' घेवून त्याची पूजा केली पाहिजे. फाल्गुन महिन्यात 'ढुंढीराज' व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळवारी चतुर्थी आली तर तिला 'अंगारकी चतुर्थी' असे म्हणतात. ती विशेष फलदायक असते. रविवारी चतुर्थी आली तर विशेष फळ देणारी असते.

  WD
एकवीस पत्रींचे महत्त्
गणपतीला समर्पित केली जाणार्‍या सर्व एकवीस पत्री म्हणजे विविध झाडांची पाने आयुर्वेदीय दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. या सर्व पत्री आरोग्यवर्धक, रोग‍ बरा करणार्‍या आहेत. विशेषतः दुर्वांना सर्वदोषहारी असे संबोधले जाते. दुर्वामध्ये प्रथिने खूप जास्त असतात. एक हेक्टरातील अतिरीक्त गवतामध्ये कमीत कमी पाचपट अधिक प्रथिने असतात.

  WD
गणपतीची प्रतीक पूजा
साधारणत: गणपतीची पूजा हरिद्राच्या (गोळीने) मूर्तीवर केली जाते. हरिद्रात मंगलाकर्षिणी शक्ती आहे किंवा ते लक्ष्मीचे प्रतीक असते. नारदपुराणात गणपतीची सवर्ण मूर्ती बनविण्याचा आदेश दिला होता परंतु सुवर्णाच्या अभावामुळे हरिद्रापासून बनविण्यात आली. गणपतीच‍ी विशेष कृपा लवकर प्राप्त करण्यासाठी श्वेत अर्काला पुष्य-नक्षत्रयुक्त रविवारच्या दिवशी म्हणून पंचामृताने अभिषेक करा. गणपतीची लाकडाची मूर्ती बनवून तिला घराच्या प्रवेशद्वाराबाहेर ठेवल्यास घर मंगलमय होते. 'प्रभावात्तन्मूर्त्या भवति सदन मंगलकरम्।'