शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

गणेश विसर्जन मुहूर्त 2014

ganesh visarjan
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 8 सप्टेंबर रोजी सोमवारी अकराव्या दिवशी येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.

8 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 28 मिनिटापासून सकाळी 8 वाजेपर्यंत अमृताचा चौघडिया आहे. या मुहूर्तावर केलेले विसर्जन अत्यंत कल्याणकारी ठरतील.

8 सप्टेंबर पहाटे 9 वाजून 32 मिनिटापासून 11 वाजेपर्यंत शुभाचा चौघडिया आहे, यात विसर्जन केल्याने सुख आणि शांती देणारा ठरेल.   

दुपारी 2 वाजून 8 मिनिटापासून 3 वाजून 40 मिनिटापर्यंत चरचा चौघडिया आहे ज्यात करण्यात आलेले विसर्जन जीवनातील आरोग्यासंबंधी त्रासांपासून मुक्ती देणारा असेल.

3 वाजून 40 मिनिटापासून 5 वाजून 12 मिनिटापर्यंत लाभाचा चौघडिया आहे. या मुहूर्तावर विसर्जन केल्याने व्यापारिवर्गाला लाभ होईल. या योगात विसर्जन केल्याने नक्कीच लाभ मिळेल.  

सायंकाळी 5 वाजून 12 मिनिटापासून 6 वाजून 44 मिनिटापर्यंतचा मुहूर्त अमृत चौघडियाचा आहे. यात केलेले विसर्जन गृहस्थांसाठी आनंद देणारे ठरतील.

संध्याकाळी 6 वाजून 44 मिनिटापासून 8 वाजून 12 मिनिटापर्यंत चरचा चौघडिया आहे, हा मुहूर्त सार्वजनिक मंडळाने स्थापित केलेल्या श्री गणेशच्या विसर्जनासाठी परम शुभकारी आहे.   

जे लोक काही कारणांमुळे या सर्व मुहूर्तांमध्ये श्री गणेश विसर्जन नाही करू शकले त्यांच्यासाठी 8 सप्टेंबरचा शेवटचा विसर्जन मुहूर्त रात्री 11वाजून 8 मिनिटापासून 12 वाजून 36 मिनिटापर्यंत आहे. तसं तर हा लाभाचा चौघडिया आहे पण या मुहूर्तावर श्री गणेश विसर्जन असामान्य परिस्थितीतच करावे.