गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 सप्टेंबर 2014 (12:54 IST)

५00 वर्षापूर्वीची गणेश मूर्ती : ॥ प्राचीन गणेश॥चक्रेश्‍वरवाडी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले राधानगरी तालुक्यातील चक्रेश्‍वरवाडी येथील चक्रेश्‍वर मंदिरातील पाच फुट इतकी उंच असणारी गणेशाची मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. उजवी सोंड असणारा हा गणपती स्वयंभू असल्याचे बोलले जाते. या मंदिरामध्ये असलेल्या शिलालेखावरून हि मूर्ती फारच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. या शिलालेखावर विक्रम सवंत १४२१ म्हणजेच इ.स.१४९९ हि अक्षरे स्पष्टपणे दिसतात. तत्कालीन राजाने या मंदिराला जमीन दान केल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे हे मंदीर विक्रम सवंत १४२१च्याही आधीचे असल्याचे स्पष्ट आहे. त्यावरून या गणेशाच्या मूतीर्ची प्राचीनता लक्षात येते.
 
चक्रेश्‍वर मंदिरात प्रवेश करताच प्रथम गणेशमूर्तीचे दर्शन होते. पाच फुट उंच असणारी हि गणेशमूर्ती फारच आकर्षक आहे. या गणपतीच्या डोक्यावर सोनेरी मुकुट आहे. चार हात आहेत. त्यातील दोन हातामध्ये शस्त्रे, एका हातात मोदक तर एक हात मांडीवर टेकून रुबाबात उंदीर या गणेशाच्या वाहनावर आसनस्थ झाल्याचे दिसते, तर कमरेला सर्प गुंडाळला आहे. या गणपतीच्या समोर शंभर फुटांवर भव्य दीपमाळ आहे. या दीपमाळेवर या गणेश मूर्तीची प्रतिकृती ? पान २ वर (पान १ वरून) असणारी गणेशमूर्ती कोरलेली दिसते. गणेशाची मुख्य मूर्ती आणि दीपमाळेवरील मूर्ती एकमेकांकडे पाहात असल्याचा भास दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये होतो. मुख्य मूर्ती पूर्वाभिमुखआहे तर दीपमाळेवरील मूर्ती पश्‍चिमाभिमुख आहे. १ मे ते ४ मे दरम्यान या मंदिरात उगवत्या सूर्याचा किरणोत्सव होतो. त्यावेळी शिवलिंगावर जाणारी किरणे गणपतीच्या डोक्याला स्पर्श करून जातात. या मंदिरात सोमवार, गणेशजयंती, संकष्टी, गणेशचतुर्थी या सणाला मोठी गर्दी असते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.