शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By

नारळ- पनीर लाडू

साहित्य : 1 लीटर दुधाचे पनीर, 2 चमचे साखर, 200 ग्रॅम नारळ किसलेले, 1 कप दूध, 1/2 चमचा वेलची पूड, केशर काड्या व गुलाब पाणी, सुके मेवे बारीक काप केलेले.
कृती : सर्वप्रथम पनीर व साखर चांगल्याप्रकारे मॅश करून त्या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड व केशर काड्या टाकाव्या. एका कढईत दूध व किसलेले नारळ घालावे, त्यात 2 चमचे साखर टाकावी, या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत शिजवावे. 
 
या मिश्रणाला थंड करून त्याची 10-12 लहान लहान गोळे तयार करावे तसेच पनीरच्या मिश्रणाच्यासुद्धा 10-12 गोळे तयार करावे. पनीराचे गोळे घेऊन हातावर फैलवून त्यात मधोमध नारळाची गोळी ठेवून सावधगिरीने बंद करून लाडू बनवून घ्यावे. सर्विंग प्लेटमध्ये हे लाडू ठेवून त्यावर गुलाब पाणी शिंपडून काप केलेला सुक्या मेव्याने सजवून देवाला नैवैद्य दाखवावा.