शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा

भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. गणरायाचा जन्म याच दिवशी झाला. देवांचा देव आणि त्यांच्या सेनेचा प्रमुख असलेला गणराय सामान्यांचा लाडका गणपती बाप्पा आहे. आपल्या दुःखाचे हरण करणारा हा दुखहर्ता आहे, अशी लोकांची भावना आहे. म्हणूनच ही मंगलमूर्ती जनमानसाच्या ह्रदयात विराजमान झालेली आहे. कोणत्याही पूजेत अग्रपूजेचा मान श्रीगणेशाचा आहे. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ होण्यास श्रीगणेशा ही संज्ञा प्राप्त झाली आहे. गणपती ही बुद्धीचीही देवता आहे. मूषकावर स्वार होऊन हा तुंदीलतनू लोकांच्या भेटीला दरवर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी येत असतो. म्हणूनच त्याच्या स्वागतप्रसंगी त्याची पूजा करण्याची संधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. 

गणेशचतुर्थीच्या निमित्ताने या लाडक्या गणपती बाप्पाचे ऑनलाईन पूजनही तुम्ही आता करू शकता.

श्रीगणेशाच्या पूजेसाठी येथे क्लिक करा

फुले अर्पण करण्यासाठी `फुले` यावर क्लिक करा.
फळांचा प्रसाद ठेवण्यासाठी थाळीत ठेवलेल्या `फळां'  वर क्लिक करा.
मिठाई अर्पण करण्यासाठी थाळीत ठेवलेल्या `मिठाई`वर क्लिक करा.
घंटी वाजविण्यासाठी `घंटी`वर क्लिक करा.
आरती करण्यासाठी `दिव्या`वर क्लिक करा.
आरती वाजविण्यासाठी `प्ले आरती` वर क्लिक करा