शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 24 एप्रिल 2014 (11:20 IST)

117 जागांसाठी आज मतदान

लोकसभा निवडणूक सहावा टप्पा
काँग्रेस, भाजपसह द्रमुक, अण्णा द्रमुक
शिवसेना, राष्ट्रवादीचा आज गणिताचा पेपर


लोकसभा निवडणुकीच सहाव्या टप्प्यात  गुरुवारी 117 मतदारसंघात मतदान होत असून भाजप, काँग्रेस, अण्णा द्रमुक, द्रमुक, राष्ट्रवादी, शिवसेनेचदृष्टीने पेपर गणिताचा म्हणावा लागेल. सत्ता स्थापनेसाठी 272 प्लसचे लक्ष्य उरी बाळगणार्‍या भाजपच रालोआची आणि 125 वर्षाच्या काँग्रेसने या टप्प्यात संपुआला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणसाठी कसून प्रत्न केले आहेत.

11 राज्ये व पाँडेचेरीमधील 18 कोटींपेक्षा अधिक मतदारांना मतदानाचा अधिकार सहाव्या टप्प्यात बजावता येईल. भाजपने तयार केलेली सहा पक्षांशी युती  द्रमुक-अण्णा द्रमुकला कशी टक्कर देते, हे याच टप्प्यात निश्चित होणार आहे. तममिळनाडूतील सर्व 39 मतदारसंघात आज मतदान होत आहे.

गेल्या निवडणुकीत द्रमुकने 18 व अण्णाद्रमुकने 8 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला यंदा आठ जागांपैकी एकही जागा टिकविता येणार नाही, असे वातावरण सध्या तमिळनाडूत आहे.

प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मंत्री दयानिधी मारन, माजी दूरसंचारमंत्री ए.राजा, द्रमुक नेते टी. आर. बालू, अर्थमंत्री चिदम्बरम यांचा पुत्र कार्ती आदींचा समावेश आहे.

हाराष्ट्रात 19 मतदारसंघात मतदान होत असून केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, प्रिया दत्त, (पान पाच पाहा)गुरुदास कामत, ‘आप’च्या मेधा पाटकर, मीरा संनल आदींचा सङ्कावेश आहे. उत्तर प्रदेशात आज होत असलेल्या चौथ्या टप्प्यात 187 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. सपंचे सर्वेसर्वा (नेताजी) मुलायसिंह यादव (मैनपुरी), त्यांची सून डिम्पल (कनोज), परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद (फारूखाबाद), जयंत चौधरी, हेमामालिनी(मथुरा) यांचा समावेश या टप्प्यात आहे.

बिहारमध्ये भाजपचे शाहनवाझ हुसेन (भागलपूर), राष्ट्रवादीचे तारिक अन्वर (कटिहार), राजद नेते मोहम्मद तस्लीमुद्दीन रिंगणात आहेत. पश्चिम   बंगालमध्ये सहा मतदारसंघात मतदान होत असून राष्ट्रपतीपुत्र अभिजित मुखर्जी व दीपा दासमुन्शी नशीब अजमावत आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेत सुषमा स्वराज यांच्या विदीशा मतदारसंघात मतदान होत असून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन विक्रमी आठव्यांदा   सलग विजय मिळविण्यासाठी इंदूरमध्ये प्रयत्नशील आहेत.

झारखंडमध्ये चार मतदारसंघात 72 उमेदवार नशीब अजमावत आहेत. आसामध्ये सहा ङ्कतदारसंघात 74 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. पंतप्रधान डॉ.  मनमोहनसिंग व त्यांची पत्नी गुरुशरणकौर मतदानासाठी दिसपूर सरकारी उच्च माध्यमिक शाळेत येणार आहेत. काश्मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघात ङ्कतदान होत असून 12 उमेदवार रिंगणात आहेत. छत्तीसगडमध्ये राहिलेल 7 मतदारसंघात मतदान होत आहे.