मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: वाराणसी , शनिवार, 19 एप्रिल 2014 (12:11 IST)

अरविंद केजरीवाल यांच्यावर दगडफेक

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात शुक्रवारी पुन्हा दगडफेक झाली. मोदी समर्थकांनी हा प्रकार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्यावर दगड आणि विटांचे तुकडे फेकण्यात आले. हा प्रकार घडला त्यावेळी गुरुवारी हल्लेखोर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देत होते, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

यापूर्वीही केजरीवाल यांच्यावर अनेक हल्ले झाले आहेत. आतापर्यंत तीनजणांनी त्यांच्यावर रोड शोमध्ये हल्ला केला. तसेच, एकदा त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. तर, एप्रिल महिन्याच्या सुरवातीला दिल्लीतील एका रिक्षावाल्याने त्यांना थप्पड मारली होती. दुसर्‍या दिवशी केजरीवाल यांनी रिक्षावाल्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती.

वाराणसी लोकसभा मतदारसंघात केजरीवाल विरुद्ध मोदी असा सामना होत आहे. मतचाचण्यांनुसार नरेंद्र मोदी यांना यावेळी सर्वाधिक चांगले मतदान मिळेल असे सांगण्यात येत आहे.