शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Updated :खेड , सोमवार, 21 एप्रिल 2014 (11:45 IST)

उद्धव नव्हे उध्दट ठाकरे : शरद पवार

मी श्रीमंतभोगी नसून उद्धव ठाकरेच श्रीमंतभोगी आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या पक्षाचे आपण नेतृत्व करत आहोत. बापजाद्याची संघटनेची श्रीमंती उध्दव ठाकरे यांना आपोआप मिळाली आहे. माझे वडील राजकारणात नव्हते. मी स्वत: निर्माण केले आहे. अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
 
उद्धव ठाकरे ऐवजी त्यांना उद्धट ठाकरे म्हणण्यात यावे, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांकडूनच करण्यात आली. आयुष्यात ज्यांनी एकही निवडणूक लढवली नाही, त्यांनी मला राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर घाबरले असे म्हणण्याचे धाडस करू नये. मी आतापर्यंत 14 वेळा निवडणूक लढवली आणि एकदाही पराभूत झालेलो नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे रोखठोक प्रतिपादन पवार यांनी केले.
 
खेड येथील नगरपालिकेच्या मागील किशोर कानडे क्रीडांगणावर तटकरे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, उमेदवार सुनील तटकरे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, बाबाजी जाधव, संजय कदम, विजय कदम, तालुकाध्यक्ष चिकणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, अजय बिरवटकर, महिला आघाडीच्या दीप्ती शेलार, सायली कदम, माजी नगराध्यक्ष शुभांगी टाकळे, अस्मिता केंद्रे आदी उपस्थित होते.
 
पवार म्हणाले, देशाचा कृषिङ्कंत्री म्हणून काम करत असताना गेल्या दहा वर्षात खासदार अनंत गीते हे कोकणच्या विकासाचा एकही प्रश्न घेऊन माझ्याकडे आले नाहीत. कोकणातील आंब्याच्या उत्पादनाचा प्रश्न, फळफळावळ, म त्स्यव्यवसाय, आंब्याची निर्यातीचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार अनंत गीते यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. गीतेंनी या प्रश्नांची मांडणी कधी केलीच नाही. त्यांना प्रश्न सोडविण्याचा अधिकार असताना ते आले नाहीत, असे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी हा खासदार कंटाळा करतो, मतदारसंघाविषयी अजिबात चिंता नाही, अशा खासदाराला तुम्ही लोकसभेवर पाठवणार का? याउलट विकासाची जाण असलेला मतदारसंघाचा खर्‍या अर्थाने विकास करणारा खासदार म्हणून सुनील तटकरेंना आपण निवडून दिले पाहिजे.
 
नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल पवार म्हणाले की, भारतीय लोकशाहीप्रमाणे निवडून आलेल्या खासदारांमधून बहुमत असलेल्या गटाने पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडायचा असतो, अशी आपली लोकशाही व्यवस्था आहे, परंतु भाजपने ही प्रक्रियाच धाब्यावर बसवून पंतप्रधानपदाचा उमेदवार आधीच निवडून टाकला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले आपल्याकडे चालते. सत्तेचे केंद्रीकरण होणे म्हणजे हुकूङ्कशाहीकडे जाणारी व्यवस्था निर्माण होते आणि आपल्या देशातील जनता हे कदापी होऊ देणार नाही, असे पवार यांनी सांगितले.