गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 27 मार्च 2014 (12:33 IST)

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 28 मार्चला विदर्भाच्या दौ-यावर

वर्धा तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा-देसाईगंज येथे जाहीर सभा
 
काँग्रेस उपाध्यक्ष श्री राहुलजी गांधी येत्या शुक्रवारी 28 मार्च 2014 रोजी विदर्भाच्या प्रचार दौ-यावर येणार आहेत.
 
नियोजित कार्यक्रमानुसार ते 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री सागर मेघे यांच्या प्रचारार्थ वर्धा येथील जुने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मैदानात जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.श्री नामदेवराव उसेंडी यांच्या प्रचारार्थ ते गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. 
या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री मोहन प्रकाश, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आ.श्री बालाराम बच्चन यांच्यासह काँग्रेस आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.