गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Modified: उस्मानाबाद , गुरूवार, 10 एप्रिल 2014 (12:08 IST)

'खुनाचा आरोप असणारे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे'

जळगाव येथील घरकुल घोटाळ्याचे आरोप असणारे शिवसेनेचे आमदार सुरेश जैन तुरुंगात आहेत. त्यांना मुद्दाम डांबून  ठेवण्यात आले आहे. मात्र खुनासारखा गंभीर आरोप असणारे राष्ट्रवादीचे डॉ.पद्मसिंह पाटील बाहेर कसे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना केला आहे.यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलीभगत असल्याचाही आरोप आरोप उद्धव ठाकरे यांनी केला  आहे.

यावेळी उद्धव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा चांगला समाचार घेतला. राष्ट्रवादीतील खुनाच्या आरोपाखाली असणारे बाहेर  पडतातच कसे आणि त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले जाते कसे, हा सर्व पवारांच्यामुळे होत आहे. तसेच बोटावरची शाई पुसून  डबल मतदान करण्याच्या शरद पवारांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

उद्धव ठाकरे हे लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारासाठी उस्मानाबाद आले असताना ते बोलत  होते.