गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Updated :बीड , बुधवार, 16 एप्रिल 2014 (11:33 IST)

गोपीनाथ मुंडेंना मनसेचा जाहीर पाठिंबा

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडेंना महाराष्ट् नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. बिनशर्त पाठिंब्याचे एक जाहीर पत्रकच मनसेच्या वतीने काढण्यात आले आहे. बीड लोकसभा मतदार संघातील मनसे कार्यकर्त्यांना मुंडेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्याशी चारहात करताना मनसेच्या या भूमिकेमुळे मुंडेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीने गोपीनाथ मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचेच एकेकाळचे शिष्य सुरेश धस यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. धस यांच्या विजयासाठी स्वत: शरद पवार, अजित पवारांनी कंबर कसली आहे. मुंडेंच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांचे पुतणे धनंजय मुंडे आधीच राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंविरोधात जोरदार आरोपांची सरबत्ती सध्या आघाडीकडून सुरू आहे.

त्याच वेळी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे गोपीनाथ मुंडेंना मोठा दिलासा मिळणार आहे. बीड लोकसभा मतदार संघात मनसे भाजप उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे पत्रक मंगळवारी राज ठाकरेंनी काढले. तसे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे धसविरुद्ध मुंडे अशा चुरशीच्या लढतीत मनसेच्या मदतीमुळे ऐनवेळी मुंडेना फायदा होण्याची शक्यता आहे.