गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Updated :अबुधाबी , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (15:15 IST)

चेन्नईने किमान उपान्त्य फेरी गाठावी

चेन्नई सुपर किंग्ज या संघाने सातव्या इंडियन प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत किमान उपान्त्य फेरी गाठावी, अशी अपेक्षा या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली आहे. शुक्रवारी, येथे दुपारी चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात आयपीएलचा साखळी सामना खेळला जात आहे.

येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल आणि येथील खेळपट्टय़ांवर विजय मिळविणे हे मोठे आव्हान राहणार आहे. ढाक्यामधून खेळाडू येथे आले आहेत. काही खेळाडू न्यूझीलंडवरून आले आहेत. त्यामुळे येथील परिस्थितीशी झटपट जुळवून घेणे हे इतके सोपे नाही. त्यामुळे सुद्धा आमच्यासमोर आव्हान आहे, असेही तने सांगितले.

हवामानाबाबत बोलताना तो म्हणाला की, येथील हवामान हे मुंबई, चेन्नई अथवा कोलकाता यांच्याशी तुलना करताना थोडेसे भिन्न आहे. येथे अधिक तापमान आहे. उष्ण आणि दमट हवामानात राहणार आहे. दिल्लीमध्ये जसे वातावरण असते ते येथे राहणार आहे. एकदा काय तुम्ही खेळ सुरू केला त्याबाबत बोलता येत नाही. आमच्या संघात अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, वेस्ट इंडीजचा ड्वेन ब्राव्हो हे खेळाडू आहेत. त्यामुळे आमचा संघही मजबूत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकमुलुम आणि दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक फलंदाज प्लेसीस हेसुद्धा आमच्या संघात आहेत.

आम्ही वादविवादाला मागे टाकून खेळावर लक्ष केंद्रित करून या स्पर्धेत उतरत आहोत. त्यामुळे आम्ही किमान उपान्त्य फेरीची अपेक्षा केली आहे. बाद फेरीत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम खेळ करू शकता व ते महत्त्वाचे असते, असेही तो म्हणाला.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघात मुंबई इंडिन्सकडून खेळलेला मिशेल जॉन्सन हा धोकादायक गोलंदाज आहे. दिल्लीचा स्फोटक फलंदाज या संघात आहे. ऑस्ट्रेलियाचे जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल या संघात असल्यामुळे हा संघसुद्धा संतुलित असा संघ आहे. त्यामुळे हा सामना प्रेक्षणीय ठरेल, अशी शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

चेन्नई सुपर किंग्ज :  महेंद्रसिंह धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), सुरेश रैना, बाबा अपराजित, रविचंद्रन अश्विन, ड्वेन ब्राव्हो, प्लेसिस, ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मकुलुम, आशिष नेहरा, मोहित शर्मा, ईश्वरचंद्र पांडे, बेन हिलफेनहस, जॉन हेस्टिंग्ज, सॅमुअल बद्री, मॅट हेन्री, मिथुन मनहस, विजय शंकर, रोनीत मोरे, पवन नेगी.

किंग्ज इलेव्हन पंजाब : वीरेंदर सेहवाग, मनदीपसिंग, चेतेश्वर पुजारा, जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हीड मिलेर, ग्लेन मॅक्सवेल, रिद्दीमान सहा, मनन होरा, रिषी धवन, मिशेल जॉन्सन, मुरली कार्तिक, लक्ष्मीपती बालाजी.

दुपारी 4 वाजता * चेन्नई विरुद्ध पंजाब