गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: रायपूर , गुरूवार, 24 एप्रिल 2014 (10:45 IST)

नगमाची पुन्हा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून छेड

काँग्रेसची स्टार प्रचारक आणि अभिनेत्री नगमा हिची पुन्हा छेड काढल्याची घटना घडली आहे.  त्यामुळे नगमांना रायपूरमधील प्रचार अर्ध्यातच सोडवा लागला.

नगमा छत्तीसगडमध्ये दोन दिवसांच्या प्रचारासाठी दाखल झाल्या आहे. काँग्रेस भवनात प्रेस  कॉन्फरन्सदरम्यान झालेल्या गर्दीमुळेही नगमाला चांगलाच वैताग आला होता. दुपारी यानंतर पंडरी  येथील नुरानी चौक पोहोचल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी नगमाला घेरले. काहींनी नगमाचा हातही  पकडण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे नगमा चांगलीच नाराज झाली आहे. नगमाला व्यवस्थीत  भाषणही करता आले नाही. काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवसिंह ठाकूर यांनी नगमाची समज काढण्याचा  प्रयत्न केला. परंतु नगमाने हॉटेलमधील रुममध्ये तब्बल तीन तास स्वत:ला कोंडून घेतले होते.