गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: इस्लामपूर , बुधवार, 23 एप्रिल 2014 (10:08 IST)

नरेंद्र मोदींनी ओलांडल्या सर्व मर्यादा- सोनिया गांधी

पंतप्रधानपदाच्या खुर्चीचे स्वप्न पाहणारे भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्लमापूरमधील प्रचारसभेत केली.

सोनिया म्हणाल्या, कॉंग्रेसविरोधात खोटे आरोप करून भाजप देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानपदाची खुर्ची मिळविण्यासाठी मोदींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यामुळे भविष्यात देशाच्या सामाजिक, राजकीय आणि घटनात्मक प्रणालीला धक्का पोहचू शकतो. जनतेला खोटी माहिती आणि आश्वासने देण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. जनतेने अशा लोकांच्या हाती सत्ता दिल्यास देशाच्या लोकशाहीवर मोठा घाला येईल, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.