बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (10:18 IST)

निवडणूक लढणार्‍या सिनेकलाकारांच्या सिनेमांवर बंदी

देशात होत असलेल्या 16 लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या सिनेकलाकारांच्या सर्व कार्यक्रमांच्या प्रसारण बंद करण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला आहे. एकूण 13 कलाकार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यांनी निवडणूक आयोगाकडे सदर मागणी केली होती. त्यानंतर दूरदर्शनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गुल पनाग, जया प्रदा, महेश मांजरेकर, राखी सावंत, परेश रावल, विनोद खन्ना, रवी किशन, मनोज तिवारी, राज बब्बर, बप्पी लहरी, नगमा, स्मृति इरानी, किरण खेर आदी सिने आणि टीव्ही कलाकार निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.

या कलाकारांचे चित्रपट, मालिका आणि जाहिराती यांचे प्रसारण बंद करावे. या उमेदवारांच्या भूमिकांमुळे सामान्य मतदारांवर परिणाम होऊ शकतो. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे याचिकेमध्ये म्हटले होते.