गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (16:42 IST)

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमित शहांना दिलासा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. शहांवर घातलेली भाषणबंदी निवडणूक आयोगाने आज (शुक्रवार) उठवली. मात्र, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावरही भाषणबंदी उठविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपचे अमित शहा आणि सपाचे आझम खान यांनी प्रचारसभेत चिथावणीखोर भाषण केल्याने निवडणूक आयोगाने दोघांवर भाषणबंदीची कारवाई केली होती. त्यानंतर शहा यांनी आपल्या भाषणादरम्यान चूक झाली असल्याची शक्‍यता मान्य केली व भविष्यामध्ये प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषा न वापरण्याचे; तसेच कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग न करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आयोगाने त्यांच्या भाषणावरील बंदी उठवली. खान यांनी मात्र आयोगाच्या नोटिशीनंतरही प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे सुरुच ठेवली. याचबरोबर आपल्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे फेटाळत खान यांनी आयोगावरच एका मुलाखतीमध्ये जोरदार टीका केली आहे.