बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: बीड , सोमवार, 21 एप्रिल 2014 (17:43 IST)

बीडमध्ये आंधळेवाडीत गुरुवारी फेरमतदान

जिल्ह्यातील आंधळेवाडी येथे फेरमतदानास केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (सोमवारी) परवनगी दिली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी(24 एप्रिल) आंधळेवाडी मतदार केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे. गुरुवारी राज्यात तिसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे.

भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघात येणार्‍या आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी 17 एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाचता निवडणूक कर्मचार्‍यांना धमकी देऊन एक मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी 10 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टाने 22 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे अटकेतील सर्व आयोपी औरंगाबाद, अहमदनगर आणि आष्‍टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या सगळ्यांविरुद्ध मतदान केंद्र बळकाल्याचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. कदाचित हा गुन्हा दाखल करण्याचा पहिलाच प्रकार असावा.

आंधळेवाडी मतदार केंद्र बळकावण्यात आल्यामुळे येत्या 24 एप्रिलला फेरमतदान करण्यात येण्याची मागणी जिल्हाधिकारी यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्‍यात आली होती. त्याच आयोगाने हिरवा कंदिल दाखवला आहे.