शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Updated :रांची , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (14:46 IST)

मतदानाच्या पूर्वसंध्येला छत्तीसगडमध्ये सापडले बॉम्ब

16व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार)  मतदान होत असून, मतदानाच्या पूर्वसंध्येला अर्थात बुधवारी  सायंकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी येथे पाच जिवंत बॉंम्ब  जप्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हजारीबाग लोकसभा मतदार  संघात जवानांना बुधवारी पाच जिवंत बॉंब आढळले.  जवानांनी ते बॉम्ब ताब्यात घेतले आहेत. केंद्रीय राखीव  पोलिस दल (सीआरपीएफ) व राज्याच्या पोलिसांची  संयुक्तरीत्या ही कारवाई केली. सध्या या पसिरात शोध  मोहीम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज येथे  मतदान होत आहे.

दरम्यान, येथील जंगलमय परिसरामध्ये नक्षलवाद्यांचा वावर  आहे. निवडणुकीपूर्वी जिवंत बॉंम्ब जप्त केल्यामुळे मोठा  अनर्थ टळला आहे.