गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 एप्रिल 2014 (10:10 IST)

मुस्लिमांनी भाजपबद्दल भीती बाळगू नये- जोशी

देशातील मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाबद्दल (भाजप) कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले आहे. भाजप प्रणित राज्यांमध्ये सध्या कोणत्याही दंगली झालेल्या नाहीत. समाजात काहींकडून भाजपला मुस्लिम विरोधी असल्याचे ठरविण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप जोशी यांनी केला आहे.

जोशी म्हणाले, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहेत. मात्र या राज्यात दंगली झालेल्या नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजाने भाजपबद्दल अजिबात भीती बाळगळ्याची गरज नाही. राज्यात दंगलींसारख्या घटना होणार नाहीत याची काळजी घेणारा भाजप पक्ष आहे. देशाने अटलबिहारी वाजपेयींच्या रूपात भाजपचा पंतप्रधानही पाहिला आहे. त्यांच्या नेतृत्व काळातही कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगली झालेल्या नाहीत. त्यामुळे भाजप सरकार मुस्लिम विरोधी ठरेल, असे दावा करणारे जनतेत खोटी माहिती पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नये, असेही जोशी म्हणाले.