गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: वाराणसी- , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:00 IST)

मोदींची लाट नव्हे त्सुनामी - अमित शाह

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची देशात केवळ लाट नव्हे तर त्सुनामी असल्याचा विश्वास भाजपचे नेते अमित शाह यांनी वाराणसीत व्यक्त केला.

मोदींनी गुरूवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शो झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले, देशात मोदी यांची केवळ लाट नाही तर त्सुनामी आहे आणि या त्सुनामीमध्ये काँग्रेस, समाजवादी पाटी, बसप, आणि आम आदमी पक्ष वाहून जाईल.  दरम्यान, वाराणसी मतदारसंघातून आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मोदी आमने-सामने आहेत.