शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Updated :कोलकाता , गुरूवार, 8 मे 2014 (19:10 IST)

मोदींना रोखण्यासाठी ममता आणि डावे एकत्र?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना रोखण्‍यासाठी दोन कट्टर विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे.

केंद्रामध्ये बिगर कॉंग्रेसी आणि बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी तृणमुल कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची तयार भाकपचे माजी सरचिटणीस ए.बी. वर्धन यांनी म्हटले आहे.

सध्या ममता बॅनर्जी आणि मोदींमध्ये चांगलेच वाकयुद्ध सुरु आहे. मोदींना सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा मूळ उद्देश आहे.

ममता बॅनर्जींची यांची देखील ‍हिच इच्छा आहे. अशा परिस्थिती केंद्रात सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत त्या आमचा मित्र पक्ष बनू शकतात, असे वर्धन यांनी म्हटले आहे.