शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 23 एप्रिल 2014 (15:48 IST)

'रामदास कदम यांचे 'ते' वक्तव्य व्यक्तिगत

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आझाद मैदान दंगलीबाबत केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही एक संबंध नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 'आझाद मैदानावर पाच लाख मुसलमान जमा होतात काय. पोलिसांवर हल्ला करतात काय, पोलिसांच्या गाड्या जाळतात काय आणि शहीदांचे स्मारक तोडतात काय असे सांगत, महाराष्ट्रात माझ्या माय-भगिनींच्या अब्रुवर कोणी हात टाकणार असेल, तर नरेंद्र मोदी त्यांचा कायमचा बंदोबस्त करतील,' असे चिथावणीखोर वक्तव्य रामदास कदम यांनी केले होते. मात्र, रामदास कदम यांचे मुस्लिमविरोधी विचार हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

मुंबईतील बीकेसी मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सोमवारी प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना कदम यांनी कथित वक्तव्य केले होते.
सध्या देशात सीमा सुरक्षित नाहीत, एका बाजुने पाकिस्तान तर दुसर्‍या बाजुने चीन भारतात घुसखोरी करतो आहे. पण त्याच वेळी देशाअंतर्गत देखील मुस्लिम गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगत हिंदुंच्या संरक्षणासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन रामदास कदम यांनी केले होते. मात्र रामदास कदम यांचा मुस्लिमविरोधातील सूर पाहून पक्षातील ज्येष्‍ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नवा वाद निर्माण झाल्याचे पाहून शिवसेनेने दुरूनच अंग शेकले आहे.