गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 10 मे 2014 (12:30 IST)

राष्ट्रपती मुखर्जी मतदान करणार नाहीत

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आतापर्यंतच परंपरेनुसार लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिेयेत निष्पक्षपातीपणाची भूमिका कायम ठेवण्यासाठीच त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रपती कर्यालयाचे माध्यम सचिव वेणू राजमोनी यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले, टपाल पध्दतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र आतापर्यंत माजी राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात मतदान केलेले नाही. राष्ट्रपतींचा निष्पक्षपातीपणा कायम राहावा, या उद्देशानेच राष्ट्रपती मतदानापासून दूर राहिलेले आहेत. त्यामुळे मुखर्जी यांनीही मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण कोलकाता लोकसभा मतदारसंघामध्ये मुखर्जी मतदार आहेत.

या मतदारसंघात अंतिम टप्प्यात म्हणजेच 12 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी टपाल पध्दतीने मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे मुखर्जी यांनी   सुरुवातीस सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.