शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 8 मे 2014 (12:38 IST)

वाराणसीत मोदींच्या सभेला परवानगी नाही!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी शहरातील सभेला परवानगी नाकरली आहे. वाराणसीत गुरुवारी (8 मे) सभा होणार होती. निवडणूक आयोगाकडून ही परवानगी नाकारण्यात आल्याचे भाजपने सांगितले.

नियोजित कार्यक्रमानुसार नरेंद्र मोदी वाराणसीत दोन सभा घेणार होते. त्यापैकी एकासभेला परवानगी मिळाली नाही. मोदींच्या सभेला परवानगी न दिल्या मागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

वाराणसीतील रोहाणीया आणि बेनिया बाग या भागात सभा होणार होत्या. यातील रोहाणीया येथे होणार्‍या सभेला परवानगी नाकारण्‍यात आली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी स्वत: वाराणसीतून निवडणूक लढवित आहे. त्यांना कॉंग्रेसचे अजय राय आणि आपचे अरविंद्र केजरीवाल यांनी आव्हान दिले आहे.