मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: इंदूर , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (10:13 IST)

विवाहावेळी मोदी सज्ञान होते- नगमा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे विवाहावेळी अल्पवयीन नव्हते, असे कॉंग्रेसच्या उमेदवार व अभिनेत्री नगमा यांनी म्हटले आहे. नगमा पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

नगमा म्हणाल्या, नरेंद्र मोदी हे विवाहावेळी अल्पवयीन असल्याचे सांगतात. परंतु, ते खोटे बोलत आहेत. विवाहावेळी मोदी सज्ञान असल्याचा आमच्याकडे पुरावा आहे. प्रचारादरम्यान मोदींच्या विवाहाचा मुद्दा उपस्थित करणे चूक नाही. कारण, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी ही माहिती लपविली होती. ऐवढेच नव्हे तर  नगमा यांनी मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांचा स्तुती केली आहे. मोदींनी जशोदाबेन यांना साथ देण्याचे नाकारल्यानंतरही त्या उत्तम आयुष्य जगल्या आहेत, असेही नगमा म्हणाल्या.