शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 16 एप्रिल 2014 (11:05 IST)

व्हीव्हीआयपींची अतिरिक्त सुरक्षा काढली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची अतिरिक्त सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा अवाजवी सुरक्षेच्या कामातून मुक्त झालेले, सुमारे दोन हजार पोलिस, निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत.

राज्यातील आमदार–खासदार, मंत्री, फिल्मस्टार्स आणि व्हीव्हीआयपी लोकांना अतिरिक्त सुरक्षा असल्याचे, निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे अशी सुरक्षा काढण्याचा निर्णय आयोगाने घेतला. नेते आणि व्हीआयपी मंडळींना सुरक्षा पुरवण्यात येते. मात्र, सध्या अशा व्यक्तींच्या सुरक्षेसाठी वाजवीपेक्षा जास्त पोलीस कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

सध्या 5 मंत्र्यांसाठी 119 म्हणजे प्रत्येकी 23 सुरक्षा रक्षक काम करत असल्याचे, माहिती अधिकारात समोर आले. व्हीआयपींच्या सुरक्षेबाबतच्या माहितीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या अर्जात ही माहिती उघड झाली. 2011मध्ये 49 मंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी 213 पोलीस तैनात होते. सध्या म्हणजेच 2014 मध्ये ही संख्या 236 वर पोहोचली आहे.