गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 24 एप्रिल 2014 (10:35 IST)

शाजिया इल्मींच्या कथित वक्तव्यावर टीकास्त्र

आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या शाजिया इल्मी अडचणीत सापडल्या आहेत. इल्मी  यांचा मुस्लिम मतदारांना आवाहन करणार्याक व्हिडीओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  इल्मीवर चौफेर टीका होत आहे. विशेष म्हणजे इल्मी यांच्या कथित वक्तव्याचा आम आदमी पक्षानेही  निषेध केला आहे.

दरम्यान, 'मतदान करताना धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवावी आणि आपल्या माणसांना मतदान करावे',  असे आवाहन इल्मी यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे.

इल्मी यांच्या या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहेत. मात्र, इल्मी आपल्या वक्तव्यावर ठाम  आहेत. शाजिया इल्मींना गाझियाबादमधून निवडणूक लढवत आहेत. शाजियांच्या वक्तव्याचा फटका  आम आदमी पक्षाला बसत आहे. आम आदमी पक्ष जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप  शाजियांचे बंधू आणि भाजपचे नेते इजाज इल्मी यांनी केला आहे.