Widgets Magazine
Widgets Magazine

शनिदेवाच्या चुकीच्या समजुतींची कारणं

shani
वेबदुनिया|
WD
शनीच्या डोळ्यांमधील रागीट भाव हे त्यांच्या पत्नीच्या श्रापामुळे आले आहेत. ब्रह्मपुराणानुसार बालपणापासूनच शनी देव भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते. ते श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन असत.

विवाहायोग्य झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न चित्रस्थची कन्याशी लावून दिले. त्यांची पत्नी सती-साध्वी आणि परम तेजस्वींनी होती. एका रात्री ती ऋतू-स्नान करून पुत्र प्राप्तीसाठी त्यांच्या जवळ गेली, पण शनी महाराज श्रीकृष्णाच्या भक्तीत रममाण झाले होते.

त्यांची पत्नी प्रतीक्षा करून थकून गेली व तिचे ऋतुकाल निष्फळ झाले. म्हणून तिने रागाच्या भरात शनिदेवाला श्राप दिला की आजपासून तुम्ही ज्याला पाहाल तो नष्ट होईल.
ध्यान भंग झाल्यानंतर शनी दैवाने आपल्या पत्नीला समजावायचा प्रयत्न केला. पत्नीला सुद्धा आपल्या चुकीवर पश्चात्ताप झाला, पण शापच्या प्रतिकाराची शक्ती तिच्यात नव्हती, तेव्हापासून शनी देव खाली मान करून राहायला लागले. कारण ते कुणाचे अरिष्ट करण्याचे इच्छुक नाहीत.


यावर अधिक वाचा :