testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Shani : शनीचे वेगवेगळे रूप

shani
शनीची साडेसाती कोणत्या राशीला किती काळ अनिष्ट असते?
1) मेष : ज्यांची मेष राशी असेल त्यांना मीन
राशीत शनी आल्याबरोबर साडेसाती सुरू होते. तेव्हा पहिली अडीच वर्षे व शेवटची अडीच वर्षे चांगली जातात. परंतु मेष राशीत शनी आला म्हणजे मधली अडीच वर्षे अनिष्ट जातात.> > 2) वृषभ : ज्यांची वृषभ राशी आहे त्यांना मेष राशीत शनी आला की साडेसाती पुन्हा सुरू होते व पहिलीच अडीच वर्षे अनिष्ट जातात. पुढील पाच वर्षे त्रासदायक जात नाहीत.
3) मिथुन : यांची मिथुन राशी आहे त्यांना वृषभ राशीत शनी आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

4) कर्क : ज्यांची कर्क राशी आहे त्यांना शनी मिथुन राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

5) सिंह : ज्यांची सिंह राशी आहे त्यांना शनी कर्क राशीत आला की
साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

6) कन्या : ज्यांची कन्या राशी आहे त्यांना शनी
सिंह राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे चांगली जातात.

7) तूळ : ज्यांची तूळ राशी आहे त्यांना शनी कन्या राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

8) वृश्चिक : ज्यांची वृश्चिक राशी आहे त्यांना शनी तूळ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. मधली अडीच वर्षे त्रासदायक जातात.

9) धनू : ज्यांची धनू राशी आहे त्यांना शनी वृश्चिक राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची पाच वर्षे चांगली जातात.

10) मकर : ज्यांची मकर राशी आहे त्यांना शनी धनू राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

11) कुंभ : ज्यांची कुंभ राशी आहे त्यांना शनी मकर राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

12) मीन : ज्यांची मीन राशी आहे त्यांना शनी कुंभ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

पुढे पहा शनीच्या अवस्था....यावर अधिक वाचा :