शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. देव-देवता
Written By वेबदुनिया|

कुणाच्या बाणात होते सामर्थ्य, कृष्णानेही घेतला होता धसका

FILE
धनुर्धर तर कित्येक झाले. राम व कृष्णही धर्नुधर होते, मात्र ते साक्षात परमेश्वराचे रूप होते. देव तर काहीही करू शकतो, मात्र एक असाही धनुर्धर होता की ज्याच्या प्रतिभेने भगवान कृष्णही सतर्क झाले होते.

एका धनुर्धराने द्रोणाचार्यांना घाम फोडला होता, तर एक धनुर्धर एका बाणात शत्रू सेनेच्या रथास कित्येक फूट अंतरावर फेकून देत होता. या सर्वांच्या बाणात दम होता, मात्र सर्वश्रेष्ठ तर सर्वश्रेष्ठच राहतो. कुणास वाटत असेल की तो कर्ण होय तर उत्तर आहे नाही.

अर्जुन किंवा एकलव्याबाबत हे चिंतन सुरू नसून ही गोष्ट आहे एका धनुर्धराची की ज्याच्यासारखा कधी झाला नाही आणि होणारही नाही. प्राचीन भारतात झालेल्या हजारो धनुर्धरांपैकी सर्वश्रेष्ठ कोण. येथे सर्वश्रेष्ठ पाच धनुर्धरांबाबत विचार करूया.

पहिला धनुर्धर...


लक्ष्मण: रामाचा लहान भाऊ लक्ष्मण महान धनुर्धर होता. त्याने बाणाने ओढलेल्या रेषेत इतकी ताकद होती की कुणीही पार करून जाऊ शकत नव्हता. लक्ष्मणाच्या धनुष्य विद्येची चर्चा दूर-दूर पर्यंत होती.

शास्त्रांनुसार लक्ष्मणास श्रेष्ठ धनुर्धर मानण्यात येते. त्याने राम-रावण युद्धादरम्यान मेघनादास हरवले होते. मेघनाद ने इंद्राचा पराभव केला होता म्हणून त्याला इंद्रजीतही संबोधण्यात येत होते.

दुसरा धनुर्धर...


अर्जुन: पाच पांडवांपैकी अर्जुनाची धनुष्य विद्याही जगप्रसिद्ध होती. अर्जुन गुरू द्रोणाच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी एक होता. तुझ्याइतका श्रेष्ठ धनुर्धर दुनियेत असणार नाही, असे वचन द्रोणाचार्यांनी अर्जुनास दिले होते.

त्याला धनुष्याच्या ध्वनीने संपूर्ण युद्ध क्षेत्र गुंजून उठायचे. रथावर स्वार झालेल्या कृष्ण व अर्नुनास बघण्यासाठी देवताही स्वर्गातून उतरल्या होत्या.

तिसरा धनुर्धर...


एकलव्य: गुरू द्रोणांची मूर्ती बनवून एकलव्याने धनुष्यविद्या ग्रहण केली होती. एकलव्य अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर असल्याचे द्रोणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुदक्षिणेत त्याला अंगठा मागितला. अर्जुनाला दिलेले वचन पाळण्यासाठी त्यांनी असे केले.

चौथा धनुर्धर..


कर्ण: महाभारत काळात शेकडो योद्धे होते, मात्र युद्धात कर्णासारखा एकही धनुर्धर नव्हता. कवच-कुंडल उतरवले नसते तर त्याला मारणे असंभव होते. कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथास लागल्यानंतर रथ कित्येक दुर्रीवर फेकल्या जायचा.

अर्जुनाच्या रथावर साक्षात भगवान क्रिश्न सारथ्य करायचे आणि हनुमान बसले राहायचे तरही रथ मागे हटायचा म्हणजे कर्णाच्या धनुर्विद्येत किती बळ असेल.

मात्र लक्ष्मण, अर्जुन, एकलव्य व कर्णापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर होता. दुनियेत त्याच्यासारखा धनुर्धर झाला नाही आणि कधी होणारही नाही.

जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर....


बर्बरीक: बर्बरीक जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. युध्दाच्या मैदानात भीमपुत्र बर्बरीक दोन्ही सेनांच्या मध्यात एका पिंपळाच्या झाडाखाली पाडाव टाकला व जो हरेल त्याच्याकडूनच लढू, अशी घोषणा केली.


अर्जुन व श्रीकृष्ण त्याची विरता बघण्यासाठी उपस्थित झाले असता त्याने छोटासा नमुना दाखवला. कृष्ण म्हणाले की या झाडाच्या सर्व पानांना एका बाणात छेदून दाखव, त्याने आज्ञा घेऊन झाडाकडे बाण सोडला.

बाण सर्व पानांना छेदून जात असताना एक पान खाली पडले व कृष्णाने त्यावर पाय ठेवला, मात्र सर्व पानांना छेदून बाण कृष्णाच्या पायाजवळ येऊन थांबला. तेव्हा बर्बरीक म्हणाला की प्रभू आपण कृपया पाय बाजूला करा कारण मी बाणास फक्त पानांना छेदण्याची आज्ञा दिली आहे, पायांस नाही.

बर्बरीकच्या विरतेच चमत्कार बघून कृष्ण चिंतीत झाले. प्रतिज्ञेप्रमाणे बर्बरीक हरणार्‍याचा साथ देईल. कौरव हरत असले तर तो पांडवासाठी संकट निर्माण करेल आणि पांडव हरत असले तर कौरवांचा साथ देईल. याप्रमाणे दोन्ही सेनांना एका बाणात संपवून टाकेल.

बर्बरीकला कृष्णाने चालीत अडकवले..


भगवान श्रीकृष्ण ब्राम्हणाचा वेष करून सकाळी बर्बरीकच्या शिबिरात पोहचले व दान मागितले. बर्बरीक म्हणाला, ''माग ब्राम्हणा''. कृष्ण म्हणाले,'' तू दे शकणार नाहीस''. बर्बरीक कृष्णाच्या चालीस अडकला व कृष्णाने त्याला डोके मागितले.

बर्बरीकने पितामह पांडवांच्या विजयासाठी स्वच्छेने शीशदान केले. बर्बरीकची दानशूरता बघून कृष्णाने त्याला कलियुगात स्वत:च्या नावाने पुजल्या जाशील म्हणून वर दिला. आज बर्बरीक खाटू श्याम नावाने पुजल्या जातो. कृष्णाने त्याचे शीश ठेवले त्या ठिकाणाचे नाव खाटू आहे.