बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. देव-देवता
Written By

विशेष पुण्यदायक आहे शनिवारी येणारी शनी जयंती

शनिवारी शनी जयंती आल्यास या पर्वाचा महत्त्व आणि फल अनंत आहे.
 
शनी जयंतीचा लाभ घेण्यासाठी सर्वातआधी स्नान इत्यादिहून शुद्ध होऊन एका लाकडाच्या पाटावर काळं कापड पसरून त्यावर शनीची प्रतिमा किंवा फोटो किंवा एक सुपारी ठेवून त्याच्या दोन्हीकडे शुद्ध तूप आणि तेलाचे दिवे प्रज्वलित करावे.

या प्रतीकाला जल, दूध, पंचामृत, तूप, अत्तर याने स्नान करवून इमरती किंवा तेलात तळलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखविण्यापूर्वी त्यावर अबीर, गुलाल, शेंदूर, कुंकू आणि काजळ लावून निळे किंवा काळे फूल अर्पण करावे. नैवेद्य अर्पण केल्यावर फळ आणि श्रीफळ अर्पित करावे.
या पूजेनंतर या मंत्राची किमान एक माळ जपावी.
 
'ॐ प्रां प्रीं प्रौ स. शनये नमः' 
 
माळ पूर्ण झाल्यावर आरती करून शनीदेवाची आराधना करावी.

शनी जयंतीला या कर्मांवर लक्ष द्या:
 
* सूर्योदय पूर्वी शरीरावर तेल मालीश करून स्नान करावे.
* मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यावे.
* ब्रह्मचर्य पालन करावे.
* वृक्षारोपण करावे.
* यात्रा करणे टाळावे.
* तेलात तळलेल्या खाद्य पदार्थांचे दान गाय, कुत्र्या किंवा भिकार्‍याला करू नये.
* अपंग आणि वृद्ध लोकांची सेवा करावी.
* शनीचा जन्म दुपारी किंवा सायंकाळी असल्यावर मतभेद आहे. म्हणून या दोन्ही काळात मौन धारण करावे.
* या दिवशी सूर्य व मंगळाची पूजा करू नये.
* शनीची आराधना करताना त्यांच्या डोळ्यात बघू नये.