गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. देव-देवता
Written By वेबदुनिया|

शाकंभरी देवी

WD
संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचे एकरूप म्हणजे शाकंबरी देवी होय. या शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव नुकताच सुरू झाला आहे. त्या निमित्त..

ततोडह्मखिलम लोकमात्त्मदेह समुभ्दवें।

भविष्यामी सुरा शाकैरवृष्टे: प्राणाधारके

शाकंभरीती विख्यातम तदा

यस्याम्ह्मम भूवी।

तत्रैव च वधिकव्यामि

दुर्गामास्यम महासुरम।।


दीर्घकालीन दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असे म्हणतात. दुर्ग भावाच्या दैत्यांचा संहार करून देवीला दुर्गा हे नाव पडले. तसेच शंभर वर्षे पाऊस नव्हता म्हणून देवीने पाऊस पाडून सर्व पृथ्वी हिरवीगार केली. त्यामुळे तिला शाकंभरी असे नाव पडले. ऋग्वेदाच्या सौभाग्लक्ष्मी उपनिषदामध्ये श्रीसुक्त दिले त्यात लक्ष्मीला पद्मा, पद्मिनी, पद्मस्थिता, पद्मवर्णा, पद्मसंभवा या शब्दांनी वर्णिले आहे. महेश त्या सृष्टीचा प्रलयकाळी संहार करतात.

ही शक्ती सोळा कलांनी संहार करतात म्हणून तिला षोडशीदेखील म्हणतात. संपूर्ण जगाची ही अधिष्ठात्री आहे. हिला चिदग्निकुण्डसंभुता असं म्हटलं आहे. ही स्थूल सूक्ष्म आणि कारणरुप शरीरात वास करते. शिवाचे शिवत्व इकाररुप शक्तीमुळे असते. यमुळेच शक्तीला देवता म्हटले आहे.