Widgets Magazine
Widgets Magazine

चैत्रगौरी पूजन

navratra

चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गौरी ही माहेरी येते अशी समजूत आहे. विषम संख्यांच्या पायर्‍यांवर देवीची आरास मांडण्यात येते. गौरीचा पाळणा बसवून त्याभोवती सोयीप्रमाणे विविध फळं, फराळ, गोड पदार्थ आणि खिरापतीचा (सुके खोबरे आणि साखर) नैवेघ दाखवला जातो. हौसेप्रमाणे देवीच्याभोवती सुवासिक फुलांची किंवा आर्कषक झाडांची कुंडी मांडली जाते.

गौरीचे अक्षयतृतीयेपर्यंत पूजा करतात व त्याच दिवशी सांगता करतात. या चैत्रगौरीचा उत्सव सोयीप्रमाणे महिन्याभराच्या काळात गौरीचे रूप समजून किमान एका सुवासिनीची ओटी भरून तिला जेवायला घालण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी हळदी- कुंकु समारंभ करून सुवासिनींना बोलावतात व त्यांना कैरीची डाळ, पन्हे व खिरापत देऊन त्यांची हरभर्‍यांनी ओटी भरली जाते.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

गुढीपाडवा: कडुनिंबाचे महत्त्व

या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कुडुनिंब घालून तयार ...

news

गुढीचा मुहूर्त 2017

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन ...

news

गुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं

प्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या ...

news

यंदा दोन दिवस गुढीपाडवा

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दोन दिवस गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. २८ मार्च रोजी ...

Widgets Magazine