शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

'गुढी' उभारण्याचा शुभमुहूर्त पहाटे 6.30ला

WD
चैत्रमहिन्यातीलनवीन वर्षाचा पहिला दिवस वर्षप्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीप्रमाणे अत्यंत पवित्र असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. गुढीपाडव्यानिमित्त येत्या शुक्रवारी (23 मार्च) घरोघरी 'ब्रह्मध्वज', म्हणजेच गुढी उभारण्यात येतात. या गुढी सकाळी 6.30 ते 6.45 या शुभमुहूर्तावर उभारण्यात याव्यात.

या दिवशी ब्रह्मध्वज म्हणून उभारण्यात येणार्‍या गुढीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पहाचे चार ते पाच वाजेपर्यंत ब्रह्मयोगातील ब्राह्ममुहूर्तावर दिवाळी पहाटप्रमाणे सुगंधी उटणे, सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करून श्री गणेशासह नवसीन वर्षाच्या पंचांगाचे पूजन करावे आणि त्यानंतर शुभमुहूर्तावर उगवत्या सूर्याच्या साक्षीने आपापल्या घराच्या प्रवेशद्वारी वा गच्चीवर गुढी उभारण्यात यावी.

या गुढीच्या पायाजवळ सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाचेच प्रतीक अशा ब्रह्मध्वजाची पूजा करावी. दुपारी या ब्रह्मध्वजाला नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पावणेसात ते सात यावेळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उतरवावी, असे पं. गाडगीळ यांनी सांगितले आहे.