testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चैत्रातील व्रते

gudi padwa
वेबदुनिया|
आरोग्यव्रत : हे चैत्र शु. प्रतिपदेला करतात. यासाठी पूर्व दिवशी व्रत करुन प्रतिपदेला एका चौरंगावर अनेक प्रकारची कमळे पसरावी व त्यांच्या ठायी सूर्याचे ध्याने करावे. पांढर्‍या रंगाची सुगंधी फुले इ. सामग्री घेऊन पूजन करावे. अग्नी आणि ब्राह्मण यांना तृप्त करावे. नंतर ब्राह्मणाने आज्ञा दिल्यास भोजन करावे. अशा तर्‍हेने वर्षभर दर शुद्ध प्रतिपदेस व्रत केल्याने आणि शिवदर्शन घेतल्याने सदैव आरोग्य व सौभाग्याची प्राप्ती होते. व्रतावधी एक वर्ष.
ईश्वर गणगौरी व्रत : चैत्र शु. प्रतिपदेपासून चैत्र व. तृतीयेपर्यंत रोज शिवगौरी यांची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. हे व्रत फक्त सुवासिनीसाठीच सांगितलेले आहे. फल - सौभाग्यप्राप्ती.

कल्पादी तिथी : चैत्र शु. प्रतिपदा, पंचमी, वैशाख, शु. तृतीया, कार्तिक शु. सप्तमी, मार्गशीर्ष शु. नवमी, माघ शु. त्रयोदशी, फाल्गुन व तृतीया या कल्पारंभाच्या तिथी मानलेल्या असून त्या तिथीवर श्राद्ध केल्यास पितरांची तृप्ती होते, असे सांगितले आहे.

चैत्र शु. प्रतिपदा : या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारताच्या इतर भागांतून नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेस होतो. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले अहे. त्यांत ब्रह्मपूजा हा महत्वाचा विधी असतो. त्याचा इतिहास ब्रह्मपुराणात दिला आहे. व्रतराज या ग्रंथात असे सांगितले आहे की ब्रह्मदेवाने चैत्र शु. प्रतिपदेच्या दिवशी सकाळी समस्त जग निर्माण करून कालगणना सुरु केली. त्या ‍तिथीला सर्व उत्पात, सर्व पापे व कलीकृत दु:स्वप्ने यांचा नाश करणारी महाशांती करावी, असे म्हटले आहे.

ब्रह्मदेवाची पूजा झाल्यावर विपळे, पळे, घटिका, प्रहर इ. सर्व कालविभागांची, दक्षकन्यांची व विष्णूची पूजा करावी. याविष्ट नावाच्या अग्नीमध्ये हवन करावे. ब्राह्मण-भोजन घालावे व आप्तेष्टांना देणग्या द्याव्यात. ज्या वारी वर्षप्रतिपदा येते, त्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी, असे एक विधान भविष्यपुराणात सांगितले आहे. त्याशिवाय 'व्रतपरिचया'त एक पूजेचा विधी सांगितला आहे. तो असा....

या दिवशी सकाळी प्रात: स्नानादी नित्यकर्म उरकून हाता गंधाक्षतपुष्प्जलादी घेऊन, 'मम सकुटुंबस्य सपरिवारस्य स्वजनपरिजनसहितस्य वा आयुरारोग्यैश्वर्यादि सकलशुभफलोत्तरोत्तराभिवृध्द्यर्थ ब्रह्मादिसंवत्सर चौरस चौरंगावर किंवा वाळूच्या पेढीवर शुभ्रवस्त्र पसरुन आणि त्यावर हळदीने किंवा केशराने मिश्रित अशा अक्षतांचे अष्टदळ कमळ तयार करून त्यावर सुवर्णमूर्तीची स्थापना करावी. 'ॐ ब्रह्मणे नम:।' या मंत्राने ब्रह्मदेवाने आवाहन, असन,पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल, आरती, नमस्कार, पुष्पांजली व प्रार्थना या उपचारांनी पूजन करावे.

अशा प्रकारे उपरोक्त समस्त देवतांचे वेगवेगळे अथवा ‍एकत्र यथाविधी पूजन करावे.

टिळा व्रत : चैत्र शु. प्रतिपदेला हे व्रत करतात. त्याकरीता नदीतीरावर किंवा तळ्याकाठी जाऊन तेथे किंवा घरातच सुगंधी चुर्णाने संवत्सर मूर्ती (विष्णुची मूर्ती) लिखित करून तिची 'संवत्सराय नम:।', 'चैत्राय नम:।', 'वसंताय नम:।' आदी नामोमंत्रोच्चारपूर्वक पूजा करावी व तिला वस्त्र व फळे अर्पण करावी, तसेच विद्वान ब्राह्मणांचे पूजन करावे. त्या वेळी 'संवत्सरोसि परिवत्सरोसीडावत्सरोसि अनुवत्सरोसि वत्सरोसि।' हा मंत्र म्हणावा आणि 'भगवंस्त्वत्प्रसादेन वर्ष क्षेमामिहास्तु मे। संवत्सरोपसर्गी में विलयं यात्वशेषत:।' (अर्थ हे भगवान, तुझ्या कृपेने माझे वर्ष सुखाचे जावो आणि वर्षातील सर्व आपत्ती समूळ नष्ट होवोत.) अशी प्रार्थना करावी आणि दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे शुद्ध प्रतिपदेला असे वर्षभर व्रत केले असता भूत -प्रेत-पिशाचादिकांची बाधा नाहीशी होते.

मग कपाळास चंदनाचा टिळा लावतात. हे व्रत स्त्री व पुरुष या दोघांनी करणे युक्त आहे. या व्रताथी कथा अशी -
शत्रुंजय नावाचा एक राजा होता. त्याला चित्रलेखा नावाची एक पत्नी होती. तिने तिलकव्रत केले होते. त्यामुळे राजाला मारण्याच्या हेतूने जो जो शत्रू येईल तो तो चित्रलेखेच्या कपाळावरील टिळ्याच्या प्रभावाने त्याचा मित्र होऊन जाई. एकदा राजला हत्तीने पाडले आणि राजा मरणोन्मुख झाला. तेव्हा त्याचे प्राण नेण्यासाठी यमदुत आले. पण राजाच्या शेजारी बसलेल्या चित्रलेखेच्या कपाळावरचा टिळा दृष्टीस पडताच ते भ्याले व पळून गेले. पुढे राजाने राणीसह अनेक वर्षे सुखोपभोग घेतला.

पौरुष प्रतिपदव्रत : चैत्र शु. प्रतिपदेपासून या व्रताला प्रारंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. व्रत्कर्त्याने पाण्यात उभे राहून विष्णूचे ध्यान-पूजन व त्यानंतर पुरुषसूक्त पठण करावयाचे असते. दोन्ही पक्षांतल्या प्रतिपदांना हे व्रत करतात. हे एक तिथिव्रत आहे. फळ- विष्णुलोकप्राप्ती.

ब्राह्मण्यप्राप्ती : एक काम्य व्रत. कालावधी एक वर्ष. चैत्र शु. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत चार दिवस करावयाचे हे व्रत आहे, त्यात अनुक्रमे इंद्र, यम, वरुण व कुबेर या देवांपैकी एकेकाची एकेका तिथीला पूजा करतात. हे देव म्हणजे वासुदेवाची चार रुपे समजातत. पुजेच्या वेळी त्यांना अनुक्रमे तांबडा, पिवळा, काळा व पांढरा या रंगाची वस्त्रे समर्पण करतात. फळ - स्वर्गप्राप्ती.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

हे कायमचे लक्षात ठेऊया

national news
केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...

पौर्णिमाचे उपाय

national news
पौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...

सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव

national news
पौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...

चंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा

national news
* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

national news
काय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...