गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

नवे संवत

WD
भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

'चैत्र मास‍ि जगद ब्रम्हा सगृजे प्रथमे हनि. शुक्ल पक्ष समग्रन्तु सूर्योदये सति'।।हिमाद्री।। याचा अर्थ आहे की चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्माने जगताची रचना केली. भास्कराचार्यांनी 'सिध्दांत शिरोमणी'त लिहिले आहे, की चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या आरंभी रविवारचा दिवस, मास, वर्ष, युग एकाच वेळी आरंभ झाला. याप्रकारे चैत्र शुक्ल प्रतिपदा सृष्ट्री संवताचाही प्रारंभ दिवस आहे. जीवमात्रासाठी हा दिवस उत्सव आणि आनंदाचा महापर्व आहे कारण हाच त्याचा मौलिक जन्मदिवस आहे.

ब्रह्म पुराणावर आधारित ग्रंथ 'कथा कल्पतरू', हिमाद्री' तसेच 'कृत‍ि रत्नाकर'त याचे विवरण आहे. त्यात म्हटले आहे, की ब्रह्माने चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी सूर्योदयाच्या वेळी सृष्टी रचना प्रारंभ केली आणि त्याच दिवसापासून संवताची गणना प्रारंभ झाली. सर्व पापांना नष्ट करणारी महाशांती त्याच दिवशी सूर्योदयासोबत येते. त्यामुळे सर्वप्रथम सृष्टीकर्ता ब्रह्माची पूजा 'ॐ' चे सामूहिक उच्चारण, ताजी फुले, फळे, मिठाई यांनी युग पूजा, भुवन, सूर्याची आराधना त्यासोबतच एकमेकांना अभिवादन आणि शुभेच्छा देत उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत आणि अभिवादन करतात. हा एकमेव दिवस आहे ज्यावेळी प्रत्येक घर मंदिरासारखे सजविले जाते. पानांचे तोरण लावले जाते. महाराष्ट्रात घरोघरी गुढ्या उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.