शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

भारतीय नववर्षारंभ

ND
काळ अनादी अनंत आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा इतिहास वेदातूनही कळतो. वेद अपौरूषेय आहेत. ते परमेश्वरानेच सांगितले आहेत, असे मानले जाते. ऋग्वेद हा या सर्व वेदातील प्राचीन वेद म्हणून ओळखला जातो. त्यात सृष्टीच्या उत्पत्तीविषयी म्हटले आहे, की सगळीकडून प्रकाशमान तपरूप परमात्म्यातून ऋत (सत्य संकल्प) आणि सत्य (भीषण) यांची ुत्पत्ती झाली. या परमात्म्यामधूनच रात्र आणि दिवस प्रकट झाले. समुद्र आला. समुद्राच्या उत्पत्तीनंतर रात्र धारण करणारे संवत्सर प्रकटले.

नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नव्या वर्षाचा हा पहिला दिवस असल्याने तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. सत्य युगात चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला विष्णूने माशाचा अवतार घेतला. भारतीय कालगणेनेत ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्, बार्हस्पत्य, नाक्षत्र, चांद्र व श्रावण आहेत. नऊ वर्ष गणना आहे. यात ब्राह्म, दिव्य व पित्र्य या तीन गणना युग गणेनेच्या वेळी उपयोगात येतात. सूर्य चंद्र ग्रहण समुद्राच्या भरती ओहोटीशी संबंधित आहेत. श्रावण गणना सूर्य व चंद्र यांच्यावर आधारीत मध्यबिंदू काढून सुरू करण्यात आली आहे.
संवत्सर म्हणजे ज्यात ऋतू, महिने असतात. बारा महिन्याचा काळ म्हणजे संवत्सर. संवत्सही नऊ भागात विभागले गेले आहे. पण प्रामुख्याने लोक चंद्र संवत्सर मानतात. चंद्र संवत्सराचा प्रारंभ शुक्ल प्रतिपदेला होतो. या दिवशी सत्ययुगाला प्रारंभ झाला, असे मानले जाते. भारतीय सम्राट विक्रमादित्यानेही आपल्या नावाचे संवत्सर आजपासूनच सुरू केले होते. आजपासून दोन हजार ६४ वर्षापूर्वी चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच हे संवत्सर लागू करण्यात आले.

वर्ष प्रतिपदा अर्थात पाडवा कसा साजरा करावा हेही पुराणात सांगण्यात आले आहे. त्यानुसार या दिवशी प्रत्येक हिंदूने घरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारली पाहिजे. तेल, उटणे लावून स्नान केले पाहिजे. विविध देवदेवतांचे पूजन केले पाहिजे.

या दिवशी नव्या वर्षाच्या पंचांगांची पूजा ब्राह्मणाद्वारे करावी. आगामी वर्षात रोगराईपासून दूर रहावे यासाठी कडूलिंबाची पाने चावून खायला हवीत. या पानांचे चूर्ण करून त्यात काळी मिरी, मीठ, हिंग, जीरा, ओवा मिसळून ते खाल्ल्यास उत्तम.