शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

हिंदू धर्मशास्त्रातील कालवाचन

WD
गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्ष अर्थात शालिवाहन शकाची सुरवात. विक्रम संवत हे त्याही आधीचे. विक्रम संवतच्या १३५ वर्षानंतर शालिवाहन शकाची सुरवात झाली. इसवी सनाची सुरवातही विक्रम संवताच्या ५७ वर्षांनंतर झाली.

चैत्र वर्षाच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसाला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानतात. या दिवशी ब्रह्माने सृष्टीची रचना केली. तेव्हापासून कालगणना सुरू झाली. त्याला सृष्टी संवत किंवा ब्रह्मसंवत म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सृष्टीची निर्मिती होऊन १,९७, २९, ४९, १०६ वर्षे उलटली आहेत.

चैत्र शुक्ल एकादशीशी अनेक महत्त्वाचे दिवस निगडीत आहेत. या दिवशीच सृष्टीचा प्रारंभ झाला. दुर्गेच्या उपसानेचा दिवसही हाच. श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक, सम्राट विक्रमादित्याद्वारे विक्रम संवतचा प्रारंभ, युधिष्ठिराचा राज्याभिषेक, युगाब्ध संवत प्रारंभ, शीखांमधील द्वितीय गुरू अंगद देवजी यांचा जन्म, वरूण अवतार असलेल्या झुलेलाल यांची जयंती, आर्य समाजाचा स्थापना दिवस, शालिवाहन शकाचा आरंभ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्म अशा महत्त्वाच्या घटना या दिवशी घडलेल्या आहेत.
हिंदुंची कालगणना

मृत्युलोकातील मनुष्यप्राण्याच्या कालगणनेप्रमाणे चार अब्ज बत्तीस हजार वर्षे संपतील, तेव्हा जगाचा कर्ता असलेल्या ब्रह्मदेवाचा एक दिवस संपेल. अशा रितीने ब्रह्मदेवाची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा त्याची सृष्टी नाशाप्रत जाईल. जगाची उत्पत्ती होऊन सध्या ब्रह्मदेवाची पन्नास वर्षे झाली आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपेपर्यंत 14 मन्वंतरे होतात. त्यापैकी स्वंयभू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष ही मन्वंतरे झाली आहेत. सध्या वैवस्वत मन्वंतर चालले आहे. यानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रूद्रसावर्णि, देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि ही सात मन्वंतरे यायची आहेत. प्रत्येक मनू 71 महायुगे असतो. एक महायुग 43, 20, 000 वर्षे चालते. आतापर्यंत 27 महायुगे झाली आहेत. सध्या 28 वे महायुग चालले आहे. या 28 व्या महायुगातील कृतयुग ((17,28,000 वर्षे), त्रेतायुग ( 12, 96, 000 वर्षे), द्वापारयुग ( 8, 64, 000 वर्षे) ही तीन लहान युगे संपून चौथे कलियुग सध्या सुरू आहे. ते 4, 32 000 वर्षे चालेले. त्यातील सध्या 5079 वर्षे संपली.

(आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकातून काहमाहितसाभार)