शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

गोळ्यांची कढी

साहित्य : ताजे ताक दोन वाट्या, डाळीचे पीठ ३ चमचे, २ चमचे तूप, हिंग, जिरे, मेथ्या १/४ चमचा, हळद अर्धा चमचा, मिरची एक, आलं किसून १ चमचा, कढीपत्ता ४ ते ५ पाकळ्या / पाने, १ चमचा साखर. गोळ्यांसाठी हरबरा डाळ ४ ते ५ तास भिजवून. आले मिरची, लसूण, जिरे, मीठ परत मीठ व किसलेले आले घालावे. कढीला सतत उकळी आणू नये. ती फुटते.

गोळ्यांसाठी कृती : भिजलेली डाळ मिक्सरवर जाडसर वाटावी. त्यामध्ये वाटतानाच आले, लसूण, मिरची, मीठ, जिरे घालावे. आपल्या चवीनुसार वरून हळद घालावी. वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोळे वळावेत. तयार गोळे चाळणीला तेल लावून अथवा कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ठेवून वाफवावे अथवा प्रेशरकुक करावेत. जेवणापूर्वी गोळे कढीत सोडावे व गरम करावे. वरून चिरून कोथिंबिरीने सजवावे.