गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

गुजराती बटाटा साग

ND
साहित्य : 6 बटाटे, 1/4 चमचा तेल, 2 कप पाणी, 3/4 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 2 लाल मिरच्या, 1/2 चमचा हळद पूड, दीड चमचा ति‍खट, 1/2 चमचे धणे-जिरे पूड, 3 छोटे चमचे मीठ, 3 कोकम, 20 ग्रॅम गूळ किसलेला.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे शिजवून घेऊन त्याचे तुकडे करा. कढईत तेल गरम करून मोहरी घाला. तडतडताच हिंग आणि लाल मिरच्या घाला. काही सेकंद ढवळा. पाणीसोडून सर्व पदार्थ आणि बटाटे घाला. चांगले मिसळा. उरलेले पाणी घाला. एकदा ढवळून उकळी येऊ द्या. आच कमी करा आणि साधारण 5 मिनिटे शिजवा. गरम गरम पूरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.