बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

सुरण बटाटानु साग

(सुरण बटाट्याची भाजी)

ND
साहित्य : 1/2 किलो बटाटे सोलून चार भाग केलेले, 3/4 सुरण सोलून तुकडे केलेला, 1/3 कोथिंबीर, पुदिना कापलेला, 3 कप पाणी, 20 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1/2 कप तेल, 2 मोठे कांदे किसेलेले, 4 मध्यम टोमॅटो कापलेले, 5 छोटे चमचे मीठ, 2 छोटे चमचे हळद पूड, 2 मोठे चमचे मिरची पूड, 2 छोटे चमचे गरम मसाला पूड.

कृती : सर्वप्रथम आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे वाटण करून घ्या. कुकरमध्ये तेल साधारण 3 मिनिटे गरम करा. कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. वाटण घाला. काही सेकंद ढवळा. टोमॅटो, मीठ, हळद, मिरची आणि गरम मसाला पूड घाला. टोमॅटोचा लगदा होईपर्यंत आणि तेल वेगळे सुटेपर्यंत शिजवा. अधूममधून ढवळत रहा. पाण्याशिवाय सुरण व इतर सारे पदार्थ घाला. ढवळा आणि साधारण 3 मिनिटे परता. पाणी घाला एकदा ढवळा आणि 2 मिनिटे शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.