शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 12 मे 2016 (11:38 IST)

12 मे : वर्षाचा पहिला आणि शेवटचा सर्वात मोठा मुहूर्त

जर आपल्याला घर, ऑफिस किंवा इतर कामांसाठी मोठी खरेदी करायची असेल तर 12 मे रोजी एक दुर्लभ शुभ संयोग बनत आहे. हा वर्षाचा पहिला आणि शेवटचा गुरु पुष्य योग आहे. या अगोदर 14 एप्रिल रोजी देखील पुष्य नक्षत्र होत, पण संध्याकाळी सूर्यास्त नंतर पुष्य नक्षत्र असल्यामुळे गुरु-पुष्य योग मान्य नव्हता. गुरुवारी पुष्य नक्षत्रासोबत 2 इतर शुभ योग असल्यामुळे हा दिवस फार खास झाला आहे. यात तुम्ही भरपूर खरेदी व इतर शुभ कार्य (विवाह सोडून) करू शकता. हा नक्षत्र गुरुवारी असल्यामुळे याचा महत्त्व अधिक वाढला आहे.  
 
खरेदीचा मुहूर्त गुरुवार 12 मे रोजी सकाळी 5 वाजे पासून सुरू होऊन पूर्ण दिवसभर राहणार आहे.

पुढे पहा गुरु पुष्य योगात करण्यात आलेले सोपे उपाय.... 
गुरु पुष्य योगात करण्यात आलेले सोपे उपाय
 
1. या गुरुवारी संध्याकाळी लक्ष्मीची विधीनुसार पूजा करावी नंतर लक्ष्मीच्या चरणात सात कौड्या ठेवाव्या. अर्ध्या रात्री नंतर या कौड्यांना घरातील एखाद्या कोपर्‍यात खणून द्या. हा उपाय केल्याने धनाशी निगडित सर्व समस्या दूर होतात.  
 
2. गुरु पुष्याच्या रात्री अंघोळ करून पिवळी धोती धारण करावी आणि एका आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसावे. आता आपल्या समोर  सिद्ध लक्ष्मी यंत्राला स्थापित करावे, जे विष्णू मंत्राने सिद्ध असेल आणि स्फटिक माळेच्या खाली लिहिलेल्या मंत्राचे 21 माळेचा जप करावा.  
 
मंत्र जप करताना मध्ये उठायचे नाही, मग साक्षात लक्ष्मी देखील तुमच्यासमोत आली तरी चालेल.   
मंत्र- ऊं श्रीं ह्रीं श्रीं ऐं ह्रीं श्रीं फट् या उपायाला विधिपूर्वक संपन्न केल्याने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन जाते.  
 
3. जुने चांदीचे नाणे आणि रुपयांसोबत कौडी ठेवून त्याची केशर आणि हळदीने पूजा करावी. पूजेनंतर त्यांना तिजोरीत ठेवावे. या उपायामुळे तुमच्या तिजोरीत बरकत कायम राहील.  
 
4. गुरु पुष्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी कार्य आटपून लक्ष्मी मंदिरात जायला पाहिजे आणि देवीला कमळाचे फूल अर्पित करून पांढर्‍या रंगाच्या मिठाईचा प्रसाद द्यावा. लक्ष्मीसमोर धन संबंधी अडचणींना दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. काही दिवसांत तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल.  
 
5. गुरु पुष्याला दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून विष्णूचे अभिषेक करावे. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.  
 
6. गुरुवारी संध्याकाळी घरातील ईशान्य कोपर्‍यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा. वात कापसाची न लावता लाल रंगाच्या दोर्‍याची लावावी, तसेच दिव्यात थोडे केशर घालावे. हा प्रयोग केल्याने लवकरच धन प्राप्ती होते.