शुभ आणि मंगळ कार्यात अतिशुभ असणारे पंचपल्लव

Banana tree benefits
Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (17:05 IST)
हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात घराच्या सभोवताली लावलेले झाडे देखील आपल्या जीवनावर प्रभाव पाडतात. म्हणून हे बघणं आवश्यक असतं की कोणती झाडे लावलेली आहे आणि कोणती झाडे लावायची आहे. असे म्हणतात की घरात दुधारी फळे असणारे झाडे आणि काटेरी झाडे लावू नये. दुधारी झाडे धनहानी, फळांची झाडे अपत्य हानी आणि काटेरी झाडे शत्रू भय करतात. या झाडांचे लाकूड देखील घरात ठेवणे शुभ नसतं.
* अत्यंत शुभ पंचपल्लव -

पिंपळ, आंबा, वड, औदुंबर, पाकडं या झाडांच्या पानाला पंचपल्लव म्हणतात. कोणत्याही शुभ कार्यात या झाडांची पाने कलशात स्थापित केल्या जातात. किंवा पूजा आणि इतर मंगळ आणि शुभ कार्यात यांचा इतर पद्धतीने वापर होतो.

* चार विशेष झाडे -
पिंपळ, वड, कडुलिंब आणि केळीच्या झाडाला देवाचे रूप मानतात. पिंपळात विष्णू, वडाच्या झाडात शंकर आणि कडुलिंबाच्या झाडात ब्रहमांचे वास्तव्य आहे तसेच केळी च्या झाडात श्री गणेशाचे वास्तव्य मानले गेले आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात या झाडांचे वापर केले जाते. घराच्या अंगणात या झाडांच्या व्यतिरिक्त तुळस, अशोक,
चंपा, चमेली आणि गुलाबाच्या झाडांची लागवड केली पाहिजे. हे अतिशय शुभ सांगितले आहेत.

केळीचे झाड सर्वात शुभ मानले जाते. केळीची उपासना केल्यानं घरात शांतता आणि लक्ष्मी नांदते. केळीला साक्षात नारायणाचे रूप मानले आहे म्हणून केळीचे खांब पूजेत किंवा लग्नमांडवात लावतात. केळीची पूजा केल्यानं गुरुचे दोष देखील नाहीसे होतात. काही ठिकाणी म्हणजे घरात केळीचं रोपटं घरात ठेवू नये. असे म्हणतात की हे घरात लावल्यानं गृहस्वामीच्या उन्नतीत अडथळा आणतो. केळीचे झाड नेहमी अंगणातच लावावे. असे शास्त्र आहे.
* कोणत्या दिशेने लावावे -
घराच्या अंगणात पूर्वीकडे पिंपळ, पश्चिमेकडे वड, उत्तरेकडे औदुंबर आणि दक्षिणेकडे पाकडं लावावे. हे शुभ असतं. पण हे झाडे घरापासून लांब लावावे. जेणे करून या झाडांची सावली देखील भर दुपारी घरावर पडता कामा नये.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २७

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २७
श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबेजगज्जननी ॥ तुंचाअदिमध्यअवसानीं ॥ नमनअसोतुझियाचरणीं ॥ ...

योग्य संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी व्रत

योग्य संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी व्रत
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं. हे व्रत केल्याने ...

Haridwar Kumbh 2021: किन्नर आखाडा पहिल्यांदाच जुना ...

Haridwar Kumbh 2021: किन्नर आखाडा पहिल्यांदाच जुना आखाड्यासोबत निघणार आहे किन्नर आखाड्याची पेशवाई
किन्नर आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाले की, २०२१ मध्ये ...

चाणक्य नीती: या 6 वाईट सवयी आपले विनाश करतात

चाणक्य नीती: या 6 वाईट सवयी आपले विनाश करतात
आचार्य चाणक्य एक कुशल आणि योग्य रणनीतीकार होते. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ...

भगवान विष्णूला सुदर्शन चक्र कुणी दिले जाणून घ्या, शिव ...

भगवान विष्णूला सुदर्शन चक्र कुणी दिले जाणून घ्या, शिव पुराणात ही कथा आहे
हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार (Thursday)चा दिवस अतिशय खास मानला जातो. ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...